वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू; महिनाभरातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 12:10 PM2021-07-01T12:10:36+5:302021-07-01T12:10:47+5:30

बिटने हे नेहमीप्रमाणे आपल्या स्वतःच्या म्हशी चारण्यासाठी  ३० जूनला सकाळी घेऊन गेलेत परंतु संध्याकाळी म्हशी परत यायच्या वेळेस अंदाजे ५.३० वाजता चे दरम्यान घनदाट जंगलाने व्याप्त परिसरा मध्ये म्हशी परतीच्या वाटेवर असताना वाघाने हल्ला केला.

Death of a cowherd in a tiger attack; The second incident of the month | वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू; महिनाभरातील दुसरी घटना

वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू; महिनाभरातील दुसरी घटना

googlenewsNext

कारंजा घाडगे (वर्धा): कारंजा घाडगे तालुक्यामधील बांगडापूर - कोंढाळी रस्त्यालगत असलेल्या 55 आर एफ जोगा वनक्षेत्र जंगल व्याप्त परिसरात राहाटी येथील श्रीराम मुक्ताजी बिटने (७२)   या गुरे चालणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

बिटने हे नेहमीप्रमाणे आपल्या स्वतःच्या म्हशी चारण्यासाठी  ३० जूनला सकाळी घेऊन गेलेत परंतु संध्याकाळी म्हशी परत यायच्या वेळेस अंदाजे ५.३० वाजता चे दरम्यान घनदाट जंगलाने व्याप्त परिसरा मध्ये म्हशी परतीच्या वाटेवर असताना वाघाने गुराखी मृतक श्रीराम बिटने यांच्यावर हल्ला गेला हल्ल्यामध्ये मृतक जागीच ठार झाले संध्याकाळी म्हशी घरी परत आल्या परंतु गुराखी परत न आल्याने गुराख्याच्या कुटुंबामधील मुलं व ग्रामस्थ त्याची शोधाशोध करण्यासाठी नेहमी म्हशी जात असलेल्या दिशेने गेलेत तेव्हा म्हाताऱ्या चा मृतदेह जंगल परिसरामध्ये आढळून आला मृतकाच्या मृतदेह एवढा चिन्ह विच्छिन्न अवस्थेमध्ये होता की मृतकाच्या मानेचा भाग धडापासून पूर्णपणे वेगळा होता व त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाघाने हल्ला केल्यानंतर हल्ला केलेल्या ठिकाणापासून मृत काचा मृतदेह पाचशे मीटर पर्यंत फरफटत ओढत नेला होता व त्या ठिकाणी वाघाचे पंजे व केस आढळून आले मृतकाच्या कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत तात्काळ वन विभागाकडून मंजूर करण्यात आली असून घटनास्थळावर कारंज्याचे आर एफ ओ आरबी गायन नेर कारंजा बांगडा पूर राहाटी येथील वनविभागाचे कर्मचारी चौकशीकरिता घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

कारंजा घाडगे तालुक्यामध्ये या जोगा राहाटी आगरगाव कन्नमवार ग्राम या परिसरामध्ये घनदाट जंगल असून वाघाचे मुख्य वास्तव्याचे ठिकाण हा भाग झालेला आहे सतत या ठिकाणी वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत पासून या महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

Web Title: Death of a cowherd in a tiger attack; The second incident of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.