अंगावर क्रेन पडल्याने मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:34 PM2019-02-19T23:34:24+5:302019-02-19T23:36:08+5:30

विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने के्रन विहिरीत काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडली. यात एक मजूर जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे घडली.

The death of the crane collapses on the body | अंगावर क्रेन पडल्याने मजुराचा मृत्यू

अंगावर क्रेन पडल्याने मजुराचा मृत्यू

Next
ठळक मुद्देतीन गंभीर : मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने के्रन विहिरीत काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडली. यात एक मजूर जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे घडली.
अरविंद डोमाजी नेहारे (२५) असे मृतक मजुराचे नाव आहे. सेलू मुरपाड येथील गौतम भगत यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. याकरिता के्रनचा वापर करत असताना दुपारी अचानक के्रनचा पट्टा तुटून के्रन विहिरीत कोसळली. विहिरीच्या आत काम करीत असलेल्या मजुरांना जबर मार लागल्याने त्यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर तीघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही क्रेन सेलू मुरपाडच्या विठ्ठल धर्मराज धोटे यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. मृतक अरविंद याच्या पश्चात दिव्यांग पत्नी व सहा महिन्यांची मुलगी आहे. आता कुटुंबाचा आधार हिरावल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी मृतकाच्या परिवाराचे सांत्वन करुन जखमीची भेट घेतली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. यावेळी नागरिकांनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

Web Title: The death of the crane collapses on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.