शेळ्यांना चारा तोडताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By Admin | Published: July 2, 2016 05:31 PM2016-07-02T17:31:37+5:302016-07-02T17:31:37+5:30
शेळ्यांना चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतकऱ्याला विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने जागीच ठार झाल्याची घटना शिवणफळ येथे घडली आहे
>ऑनलाइन लोकमत -
वर्धा (समुद्रपूर), दि. 02 - शेळ्यांना चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतकऱ्याला विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने जागीच ठार झाल्याची घटना शिवणफळ येथे घडली आहे.
सदर शेतकऱ्यांचे हरिभाऊ नथ्थू कुंभारकर ,वय ४५ रा.शिवणफळ असे नाव आहे.शुक्रवारी ता.३० सायंकाळी ६ वाजता गावालगतच्या पुलाजवळील झाडावर चढून शेळ्यासाठी चारा तोडत असतांना विद्युत खांबावरील तारा झाडावर लोंबकून असल्याने या ताराला शेतकऱ्याचा हात लागला.यात जबर धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी ता.३० सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पाऊस सुरु असल्याने हि बाब कुणाच्याही लक्षात आली नाही . शनिवारी ता.१ सकाळी फिरायला जाणाऱ्या युवकांच्या जुडपात मृतदेह दिसल्याने एकच खडबळ उडाली होती.घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकात शोककळा निर्माण झाली..सदर घटनेची नोंद गिरड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ठाणेदार सुकराम थोटे तपास करीत आहे.