महा.विद्युत निगममधील कामगाराचा मृत्यू

By admin | Published: June 18, 2017 12:34 AM2017-06-18T00:34:54+5:302017-06-18T00:34:54+5:30

छातीत दुखत असल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कामगाराचा काही तासांतच मृत्यू झाला.

Death of a worker in Maha Vidyut Nigam | महा.विद्युत निगममधील कामगाराचा मृत्यू

महा.विद्युत निगममधील कामगाराचा मृत्यू

Next

ंअंत्यसंस्काराच्या वेळी काळवटले शरीर : शवविच्छेदन न करताच सोपविले पार्र्थिव
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : छातीत दुखत असल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कामगाराचा काही तासांतच मृत्यू झाला. नियमानुसार मृताचे शवविच्छेदन करणे आवश्यक होते; पण तसे न करता मृत कामगाराचे पार्थिव पत्नीच्या स्वाधीन करण्यात आले. कळंब तालुक्यातील सावरगाव येथे अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मृताचे शरीर काळे पडल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करून मृतदेह पुन्हा देवळी येथे घटनास्थळी आणण्यात आले. हा सर्व घटनाक्रम शुक्रवारच्या रात्रीपर्यंत सुरूच होता. वर्धा सामान्य रुग्णालयात शनिवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतरच पार्र्र्थिव ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम येथे कार्यरत विलास पुंडलीक वावरकर (४५) हा कामगार कंपनीच्या सकाळ पाळीत कामावर होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी कंपनीत रुजू झाल्यानंतर सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्याच्या छातीत दुखत असल्याने त्यांना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारा दरम्यान काही तासांच्या अवधीत सकाळी ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कामगाराचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे कारखाना प्रशासन व रुग्णालयातून सांगण्यात आले. शवविच्छेदन न करता नियमांना डावलून हा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी मृताचे शरीर काळे पडल्याचे एकच गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेऊन हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला. त्यामुळे संबंधित मृतदेह नजीकच्या कळंब पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. परंतु याप्रसंगी कळंब पोलिसांनी सहकार्य न करता मृतदेहाची अवहेलना केली. अश्या प्रकारचा आरोप कुटुंबियांनी केला. त्यानंतर संतप्त कुटुंबियांनी देवळीचे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विद्युत निगमचे कार्यालय गाठून रोष व्यक्त करण्यात आला.

कामगाराचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याने शवविच्छेदनाची गरज नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे संबंधित मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. हा कामगार ठेकेदारी पद्धतीतील असल्याने त्यांना नियमाप्रमाणे विमा सुरक्षा रक्कम मिळणार आहे.
- दीपक पराले, एच.आर. महा.विद्युत निगम, देवळी

 

Web Title: Death of a worker in Maha Vidyut Nigam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.