अ‍ॅपे-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:43 PM2019-07-14T23:43:34+5:302019-07-14T23:43:57+5:30

पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाला भरधाव येणाºया दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजतादरम्यान घडला. या अपघातातील दोन्ही वाहने शहर पोलिसांनी जप्त केली आहे.

Death of young man in Ape-bike cycle | अ‍ॅपे-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

अ‍ॅपे-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमहिलाश्रम परिसरातील घटना : दोन्ही वाहने केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अ‍ॅपे वाहनाला भरधाव येणाºया दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजतादरम्यान घडला. या अपघातातील दोन्ही वाहने शहर पोलिसांनी जप्त केली आहे.
महेश भारत भोयर(२३) रा. डॉक्टर कॉलनी वरुड, असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जगदीश जयंतकुमार भस्मे रा. कान्हापूर यांचा एम.एच.४९ एटी. ०३७२ क्रमाांकाचा अ‍ॅपे पंक्चर झाल्याने महिलाश्रमजवळ दुरुस्त करून ते रस्त्याच्या चुकीच्या बाजुने जात होते. याच दरम्यान एम.एच.३२ ऐबी.४४९८ क्रमांकाच्या दुचाकीवर चौघजण सेवाग्रामकडून येत होते. या भरधाव दुचाकीस्वाराने अ‍ॅपेला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत अ‍ॅपेच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक जगदिश भसमे हाही जखमी झाला. तसेच दुचाकीवरील महेश भोयर यासह आणखी एकाला गंभीर मारला लागला असून इतर दोघे किरकोळ जखमी झाले. महेशसह गंभीर जखमी असलेल्या मित्राला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता महेशचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्याच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याप्रकरणी अ‍ॅपे चालक जगदिश भसमे यांच्या तक्रारीवरुन अपघाताची नोंद घेतली असून दोन्ही वाहने पोलीसांनी जप्त केली आहे. या अपघात प्रकरणात एकाचा मृत्यू झाल्याने आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Death of young man in Ape-bike cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.