कारंजा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:52 PM2019-08-29T22:52:36+5:302019-08-29T22:52:56+5:30

शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Declare drought affected areas of Karanja taluka | कारंजा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा

कारंजा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी: संततधारेने अनेकांच्या शेतात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यात एखाद्या दररोज पाऊस कोसळत असल्याने डवरण, वखरण, निंदन ही कामे कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी ग्लायसिल, तणनाशक औषधांचासुद्धा वापर केला; मात्र गवत नष्ट झाले नाही. परिसरात मजुरांचासुद्धा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे रोजंदारीच्या भावातही वाढ झाली आहे. तालुक्यात संत्रा बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. या बागांमध्येही तण वाढल्याने संत्री गळत आहेत. अशा अनेक समस्यांनी शेतकऱ्याला वेढले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस आला तर अळ्यांसह इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो; परंतु पाण्याचा वेग कमी असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना शासकीय यंत्रणेकडून कुठलीही पाहणी झाली नाही. कृषी विभाग पांढरा हत्ती ठरत आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना दर्शन दुर्लभ झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग व महसूल विभागाला शेतकऱ्याच्या नुकसानाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.
महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीकाठावरील निम्म्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतातून चालणेसुद्धा कठीण झाले आहे. पीक अतिपावसाने पिवळे पडले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कृषी विभागाने पाहणी करणे गरजेचे आहे.
- सुनील चौधरी, माजी सरपंच, बोंदरठाणा.

Web Title: Declare drought affected areas of Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती