स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारासाठी देवळीची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:53 PM2018-01-17T23:53:15+5:302018-01-17T23:53:26+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेत क्लॉलीफाईड होण्यासाठी स्थानिक न.प.ने स्वच्छता विषयक अनेक कामे हाती घेवून घोडदौड चालविली आहे. या स्पर्धेसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष व निर्देशानुसार देवळी न.प.ने विभागीय स्तरावर १५ व्या स्थानापर्यंत भरारी घेतली आहे.

Deewar for the Clean Survey Award | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारासाठी देवळीची घोडदौड

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारासाठी देवळीची घोडदौड

Next
ठळक मुद्देनगर परिषदेद्वारे केली जातेय जनजागृती : विभागीय स्तरावर १५ वे स्थान

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेत क्लॉलीफाईड होण्यासाठी स्थानिक न.प.ने स्वच्छता विषयक अनेक कामे हाती घेवून घोडदौड चालविली आहे. या स्पर्धेसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष व निर्देशानुसार देवळी न.प.ने विभागीय स्तरावर १५ व्या स्थानापर्यंत भरारी घेतली आहे. स्पर्धेच्या अंतीम क्षणापर्यंत पहिल्या तीन क्रमांकापर्यंत उडी घेवून बक्षीसाचे मानकरी ठरण्याचा मानस स्थानिक न.प. प्रशासनाने बोलून दाखविली आहे. शिवाय स्वच्छ व सुंंदर देवळीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी लोकांना भेटून त्यांचेकडून मत जाणून घेणे सुरू आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या कार्यालयात येणाऱ्या लोकांसोबत संपर्क साधून तसेच सर्वेक्षणअपॅद्वारे विचारलेली प्रश्नांची माहिती जाणून घेतली जात आहे. स्वच्छता व सामाजिक जाणीवेच्या जनजागृतीसाठी भिंती चित्रे स्पर्धा आयोजित करून शहरातील भितींना सुंदर स्वरूप देण्यात आले. सध्या या आकर्षक रंगविण्यात आलेल्या भिंती विविध विषयांवर नागरिकांना माहिती देत आहेत. एकूणच या भिंती बोलक्या झाल्या आहेत. न.प.च्यावतीने आयोजित भिती चित्र स्पर्धेत स्वच्छ शहर, हागणदारीमुक्त शहर, पाणी वाचवा मोहीम, हुंडाबळी, बेटी बचाव-बेटी पढाव आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक भिंती चित्रे काढली. शिवाय न.प.च्यावतीने स्वच्छतेबाबत विशेष प्रबोधनही करण्यात येत आहे. प्लास्टीक निर्मुलनाची मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. नागरिकांना सूविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरूस्ती, सुशोभिकरण तसेच प्रत्येक शौचालयाचे विद्युतीकरण व बोरवलद्वारे २४ तास पाण्याची व्यवस्था केली जात आहे. ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात कचरा कुंड्यांची व्यवस्था केली जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी वाटखेडा येथील क्षेपणभूमीवर सेग्रागेशन यत्र बसविण्यात आले आहे. या यंत्राच्या माध्यमातून शहरातून निघालेल्या ओल्या कचºयावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जात आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेबाबतचे मुल्यांकन केले जाणार आहे. सर्वेक्षणानुसार सध्या ही न. प. विभागीयस्तरावर १५ व्या क्रमांकावर व जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विदर्भातील ‘क’ स्तरीय न.प.च्या स्पर्धेत देवळी न.प.चे स्थान अव्वल राहणार असल्याचे बोलले जात आहे. सन २०१५ च्या स्पर्धेत या शहराने १ कोटीच्या हागणदारीमुक्तचा राज्यस्तरीय पुरसर प्राप्त केला आहे. या पुरस्काराच्या राशीतून स्वच्छ सर्वेक्षणासाठी खर्च केला जात आहे. केंद्र सरकारच्या क्वॉलीटि कॉन्सील आॅफ इंडिया या समितीच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. समितीचे कोणत्याही क्षणी आगमण होणे अपेक्षित असल्यामुळे स्थानिक न.प. पदाधिकारी, मुख्याधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहे. एकूच या उपक्रमाच्या माध्यमातून देवळी शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
शासकीय समितीकडून शहराची पाहणी
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या दोन सदस्यीय समितीकडून बुधवारी शहराची पाहणी करण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या समिती सदस्यांनी न.प.च्या कार्यपद्धतीसह शहरातील स्वच्छतेबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच आवश्यक कागदपत्रांचीही पाहणी केली. राज्य शासनाचे उपसचिव सुधाकर बोबडे व प्रादेशिक संचालक नगर प्रशासन सुधीर शंभरकर यांनी यावेळी न.प. प्रशासनाला काही आवश्यक सूचनाही केल्या. शिवाय त्यांनी आढळलेल्या त्रुट्या पूर्ण करण्याचेही सूचविले. २० दिवसानंतर सुधारीत आढावा घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र मदनकर व न. प. मुख्याधिकरी प्रशांत उरकुडे यांनी यावेळी न.प.च्याद्वारे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी नगरसेवक शोभा तडस, सुचिता बकाने, कल्पना ढोक, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, पवन महाजन, गौतम पोपटकर, चारूबाला हरडे, मनोज निवल आदी उपस्थित होते.

Web Title: Deewar for the Clean Survey Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.