वर्धेत जनआंदोलनातून मागणी
By admin | Published: April 25, 2017 12:58 AM2017-04-25T00:58:52+5:302017-04-25T00:58:52+5:30
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
वर्धा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान काही ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची तोडफोड केली. असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वर्धेत सोमवारी जनआंदोलनातून करण्यात आली. यावेळी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. हा मोर्चा समतानगरातून निघून जिल्हाकचेरीवर धडकला.
‘त्या’ हल्ल्याचा निषेध
वर्धा: समतानगर परिसरात असलेल्या उद्यानातून आंबेडकरी जनतेने एकत्र येत जनआंदोलन केले. सकाळी निघालेल्या या मोर्चाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या निवेदनात पूर्णा, जिल्हा परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांवर अॅक्ट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करुन कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अनुसुचित जातीवरील होणारे जातीवादी हल्ले थांबवावे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचा अवमान थांबुन जातीयतेचे तेढ वाढविणाऱ्या शक्तींवर आळा घालून सामाजिक ऐक्य निर्माण करावे, पोलीस प्रशासनामार्फत अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना कार्यवाही व तपासाच्या सबबीखाली दाबण्याचा प्रयत्न करून त्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यावर प्रतिबंध लावावा आदी मागण्या करण्यात आल्या.(तालुका प्रतिनिधी)