दिंडीच्या माध्यमातून रेटली जुन्या पेन्शनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:00 AM2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:21+5:30
१ नोव्हेंबर २००५ पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. या आधारावरच राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित खाजगी शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन नाकारण्यात आली. महाराष्ट्र शासनाने नियम क्रमांक २ पोटनियम एक व खंड (ब) व नियम क्रमांक १९ नियम क्रमांक २० मधील पोट कलम दोन मध्ये १० जुलै २०२० रोजी प्रस्तावित सुधारणा करून नियमबाह्यपणे अधिसूचना प्रकाशित केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवीन परिभाषित अंशदान सेवानिवृत्त वेतन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी करता शुक्रवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून अजय भोयर यांच्या नेतृत्वात म. रा. शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती व डीसीपीएस/ एनपीएस पेन्शन बचाव कृती समितीच्यावतीने वर्धा ते सेवाग्राम आश्रम आत्मक्लेश पायी पेन्शन दिंडी काढण्यात आली.
१ नोव्हेंबर २००५ पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. या आधारावरच राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित खाजगी शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन नाकारण्यात आली. महाराष्ट्र शासनाने नियम क्रमांक २ पोटनियम एक व खंड (ब) व नियम क्रमांक १९ नियम क्रमांक २० मधील पोट कलम दोन मध्ये १० जुलै २०२० रोजी प्रस्तावित सुधारणा करून नियमबाह्यपणे अधिसूचना प्रकाशित केली. शिवाय राज्यातील समस्त शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार देय असलेली जुनी पेन्शन योजना संपुष्टात आणली. याचा निषेध करण्याकरिता व राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज ही आत्मक्लेश पायी दिंडी आयोजित करण्यात आली होती. दिंडीचा समारोप सेवाग्राम आश्रमात आत्मक्लेश व प्रार्थना करून तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आला. आंदोलनात कुंडलिक राठोड, मुकेश इंगोले, संजय बारी, सुनील गायकवाड, राज धात्रक, टोपले, मनीष मारोटकर, अमोल वाशीमकर, वाघ आदी सहभागी झाले होते.