प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जास्त नाही रास्त आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:54 PM2018-08-25T23:54:13+5:302018-08-25T23:56:17+5:30
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, लाल नाला, पोथरा, बोर व इतर प्रकल्पल्पग्रस्तांच्या जमीन संपादीत करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यांना अत्यल्प मोबदला देऊन जमीन व घरापासून बेदखल करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यासांठी अनेक आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, लाल नाला, पोथरा, बोर व इतर प्रकल्पल्पग्रस्तांच्या जमीन संपादीत करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यांना अत्यल्प मोबदला देऊन जमीन व घरापासून बेदखल करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यासांठी अनेक आंदोलन करण्यात आले. तत्कालीन विरोधी आणि आजच्या सत्ताधाऱ्यांनी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.परंतू सत्ता आल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला जात असल्याने पुन्हा प्रकल्पग्रस्तांना उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला. प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्या ह्या जास्त नसून रास्त आहे, त्यामुळे शासनाने त्याची दखल घ्यावी, असे मत शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.
प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष राजेश शिरगरे व उपाध्यक्ष धनराज टुले यांच्या नेतृत्वात गुरुवार २३ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देवेन्द्र हीवरकर, रवींद्र चाफले,आकाश निस्ताने, सुनिल शेंडे, वैभव ठाकरे या प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाकर्त्यांच्या भेटी दरम्यान अग्रवाल बोलत होते. शासकीय नोकºया देऊ शकत नसल्याने प्रत्येकी २५ लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे. उदरनिवार्हाचे साधन व निवास हिसकावून घेतले त्यापैकी अनेक बांधवांना घराचे भूखंड देण्यात आले नाही. अर्जाचा मजकूर संपूर्ण समजून न घेताच अर्ज फेटाळून अपीलात जाण्याचा सल्ला देण्यात येते. कित्येकांना अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र नाहीत, भूखंडांचे ७/१२ नाहीत. बोर प्रकल्पग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन नाही. अशा अनेक अडचणींमळे प्रकल्पग्रस्त अडचणीत असल्याने शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. त्यामुळे मागण्यांच्या पुर्ततेसाठी सुशिक्षित बेरोजगार संघटनेने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरु असून जर मागण्या पुर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेच्यावतीने दिला आहे. प्रकल्पग्रस्त संघटनेचे राजेश शिरगरे व धनराज टुले,सूर्योदय संघटनेचे शंकर पाणबुडे व ज्ञानेश्वर कोडापे, प्रकल्पग्रस्त सचिन दहाट,प्रल्हाद वाटकर, मारोतराव क्षीरसागर, अरविंद टोकसे, अवधूत पाटील, प्रभाकर निस्ताने, दिनेश कामडी, सुरेश नारणवरे, महेंद्र मात्रे, दुर्वास पानसे आदिंनी मंडपात विचार व्यक्त केले.
उपोषणकर्त्यांच्या जाणल्या व्यथा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चार दिवसांपांसून सुरु असलेल्या प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन लोकप्रतिनिधींनी त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. आज शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी कार्यकर्त्यांंसह भेट देऊन सहकार्याची भूमिका दर्शविली. तसेच प्रशासनाच्या वतीने तहसीलदार व काँग्रेसचे सुधीर पांगूळ यांनीही उपोषण मंडपाला भेट दिली.