शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:59 PM2018-05-07T23:59:57+5:302018-05-07T23:59:57+5:30
खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी म.रा. माध्य. शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात शनिवारी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वर्धेतही शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी म.रा. माध्य. शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात शनिवारी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वर्धेतही शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत निदर्शने करण्यात आली.
यात विमाशिचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे यांच्या अध्यक्षतेत शिक्षक, कर्मचाºयांनी सहभाग घेतला. या आंदोलनातून राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत २३ आॅक्टोबर १७ चा जाचक शासन निर्णय रद्द करा, माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण घ्या, वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणास १० व निवड श्रेणी प्रशिक्षणास २२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पात्र ठरवावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, मासिक वेतन एक तारखेस अदा करा, खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, कर्मचाºयांचे मे २०१८ पासून पुढील मासिक वेतन देयके मंजूर करावे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे, शालार्थ आयडी देण्याबाबत माध्य. व उच्च माध्य. शाळांत नियमानुसार नियुक्त व सक्षम प्राधिकाºयाने मान्यता दिलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे प्रलंबित असून त्यावर कारवाई करावी, प्रचलित पद्धतीने मूल्यमापनाचे २० गुण कायम ठेवावे, पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेतील मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र या विषयाचे परीक्षेणे गुण कमी करू नये आदी मागण्या लावून धरल्या.
आंदोलनात विमाशिचे कार्याध्यक्ष पांडुरंग भालशंकर, जिल्हाध्यक्ष राजू चंदनखेडे, महेंद्र सालंकार, शशांक हुलके, मंदा चौधरी, धर्मपाल मानकर, संजय पाटील, प्रमोद खोडे, प्रवीण देशमुख, सुनील दुम्पलवार, सुहास गवते, सुनील धवने, रवींद्र वाघमारे आदींनी सहभाग घेतला.