दहा महिन्यात १५७ रुग्णांना डेंग्यूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:00 AM2018-11-12T00:00:32+5:302018-11-12T00:01:08+5:30

जिल्ह्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १५७ च्यावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त असल्याने जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dengue scarring of 157 patients in ten months | दहा महिन्यात १५७ रुग्णांना डेंग्यूचा डंख

दहा महिन्यात १५७ रुग्णांना डेंग्यूचा डंख

Next
ठळक मुद्दे१० रुग्ण दगावले : इतर जिल्ह्यात उपचार घेणारे रुग्ण अधिक

गौरव देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : जिल्ह्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १५७ च्यावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त असल्याने जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील वर्षी ९३ डेंग्यू रक्तजल नमुने घेण्यात आले होते. यात केवळ ९ जणांनाच डेंग्यूची लागण झाल्याने पुढे आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर यावर्षात जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यांत ७५९ डेंग्य रक्तजल नमुने घेण्यात आले. यात १५७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले. १५७ डेंग्यू रुग्णामधील १० रुग्ण दगावल्याचे पुढे आले आहे. यातील ५ रुग्ण डेंग्यूने दगावल्याचे स्पष्ट झाले असून ५ डेंग्यू रुग्णांच्या मृत्यूबाबत डॉक्टराच्या समितीने अद्यापही कारण स्पष्ट केलेले नाही. सध्या समितीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे.
स्क्रब टायफसच्या रुग्णांतही वाढ
वातावरणातील बदलामुळे यावर्षी किटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे स्क्रब टायफस सारख्या नवीन आजारालाही समोरे जावे लागले. शासकीय आकडेवारीनुसार स्क्रब टायफससदर्भात १० रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठविले असता एकाला स्क्रब टायफस झाल्याची निष्पन्न झाले. विशेषत: या आजाराच्या रुग्णांनी शक्यतोवर खाजगी किंवा जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेतल्याने त्याची नोंद नसल्याचे सांगितले जाते.
मलेरियाचे रुग्ण घटले
मागील वर्षात मलेरिया तपासणीमध्ये ३ लाख ३५ हजार ७६० तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेक रुग्ण हे मलेरियाचे आढळले होते. मात्र, या वर्षात २ लाख ८१ हजार ७६१ तपासणी करण्यात आली. त्यात मलेरियाचे फक्त ६ रुग्ण आढळून आले आहेत. किटकजन्य आजार टाळण्यासाठी दक्षता गरजेची आहे.
बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह
सध्या हागणदारी मुक्त गाव व स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ व निर्मल करण्याचे हाती घेतले असले तरी ग्रामपंचायत उदासीन धोरणाने योजनेचे तीन तेरा वाजत असून नागरिकांना डेंग्यु, मलेरिया, स्क्रब टायफस सारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. असे आजार नागरिकांना होऊ नये यासाठी प्रत्येक गाव व परिसरासाठी बहुउद्देशिय आरोग्य कर्मचाºयांची नेमणूक केलेली असली तरी यावर प्रतिबंध लागलेला नाही. प्रत्येक गावाची पाहणी करून अहवाल शासनदरबारी ठेवण्याचे काम बहुउद्देशिय आरोग्य कर्मचाºयांचे आहे. त्यानंतर संबंधीत अधिकारी हे त्या गावातील ग्रामपंचायतीला नोटीस देऊन सुधारणा करण्याचे आदेश देतात. परंतु बहुउद्देशिय कर्मचारी अहवाल जागेवर बसून तर लिहित नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वापराच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्यास टाकी खाली करावी व पुसून कोरडे करून स्वच्छ करून वाळू द्यावी, त्यानंतर पाणी भरावे सोबतच परिसरही स्वच्छ ठेवावा. सर्वांनी स्वत:ची व परिसराची काळजी घेतल्यास आरोग्यावर परिणाम होणार नाही.
- एस. डी. काळसर्पे, आरोग्य पर्यवेक्षक,
वर्धा.

Web Title: Dengue scarring of 157 patients in ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.