वाळूघाटातील सहा तराफे नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:00 AM2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:13+5:30
देवळी येथील तहसीलदार यांच्या सूचनेनुसार, विजय गोपाल येथील मंडळ अधिकाºयांनी कर्मचाºयांना घेत कांदेगाव येथील वर्धा नदीपात्रातील वाळूघाटावर जात पाहणी केली असता वर्धा नदीपात्रालगत जुन्या गावठाणातील पडीत जमिनीवर तीन ठिकाणी अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ३० ब्रास वाळूच्या साठ्याची साठवणूक केल्याचे पाहणी दरम्यान दिसून आले. दरम्यान वाळूसाठ्याचा मोक्का पंचनामा करुन जेसीबीच्या सहाय्याने भरण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : नजीकच्या कांदेगाव येथील वर्धा नदीच्या पात्रावरुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु असल्याची माहिती विजयगोपाल येथील मंडळ अधिकाऱ्यांना मिळाली . मंडळ अधिकाºयांनी कर्मचाºयांसह वाळूघाटावर कारवाई करीत नदीपात्रात असलेले सहा तराफे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करीत टिप्पर जप्त करण्यात आले.
देवळी येथील तहसीलदार यांच्या सूचनेनुसार, विजय गोपाल येथील मंडळ अधिकाºयांनी कर्मचाºयांना घेत कांदेगाव येथील वर्धा नदीपात्रातील वाळूघाटावर जात पाहणी केली असता वर्धा नदीपात्रालगत जुन्या गावठाणातील पडीत जमिनीवर तीन ठिकाणी अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ३० ब्रास वाळूच्या साठ्याची साठवणूक केल्याचे पाहणी दरम्यान दिसून आले. दरम्यान वाळूसाठ्याचा मोक्का पंचनामा करुन जेसीबीच्या सहाय्याने भरण्यात आली. यावेळी चार टिप्परवर कारवाई करीत जप्त करण्यात आले. या वाळूघाटावरुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन सुरु असल्याचे दिसून आले.
यावेळी वाळूची वाहतूक करताना कोतवाल अमोल शेळके, कोतवाल अरविंद हजारे टिप्परसोबत मिळून आले. यावेळी नदीपात्रात असलेले एक लाख ८० हजार रुपयांचे सहा तराफे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार राठोड, सरवडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
चार टिप्पर जप्त
वाळूघाटावर पाहणी दरम्यान चार टिप्परमधून अवैध वाळूची वाहतूक सुरु असल्याचे निदर्शनास आले. महसूल अधिकाºयांनी यावेळी एम.एच.३२ ए.जे. २६८४, एम.एच.३२ ए.जे.२६६०, एम.एच.३२ क्यू. ३९४३, एम.एच.३२ क्यू. ३९४४ क्रमांकाच्या टिप्परवर कारवाई करीत टिप्पर जप्त करुन देवळी येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.