हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही,असा निश्चय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:53 PM2019-01-28T21:53:28+5:302019-01-28T21:53:56+5:30

मुलींनो शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहा तसेच संयमाने व जबाबदारीने वागा, चुकीच्या गोष्टीसाठी नाही म्हणायला शिका, अन्यायविरूध्द कायद्याची मदत घ्या. स्वाभिमानानी जगा व हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही असा निश्चय करा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी सर्व विद्यार्थिनींना केले.

Determine that marriage will not take the boy who is taking the dowry | हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही,असा निश्चय करा

हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही,असा निश्चय करा

Next
ठळक मुद्देज्योती कडू यांचे प्रतिपादन : हुंडा प्रतिबंधक कायद्यावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुलींनो शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहा तसेच संयमाने व जबाबदारीने वागा, चुकीच्या गोष्टीसाठी नाही म्हणायला शिका, अन्यायविरूध्द कायद्याची मदत घ्या. स्वाभिमानानी जगा व हुंडा घेणाºया मुलाशी लग्न करणार नाही असा निश्चय करा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी सर्व विद्यार्थिनींना केले.
स्थानिक लोकमहाविद्यालय येथे हुंडा प्रतिबंधक कायदा या विषयावर महाविद्यालयातील महिला कक्ष, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, चैतन्य सेवाभावी संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ.पुष्पा तायडे होत्या. यावेळी मंचावर ज्योती कडू, विजय नंदागवळी, अतुल चौधरी तसेच प्राचार्या डॉ.संगीता धनाढये उपस्थित होते.
प्रा.विजय नंदागवळी यांनी दिवसेंदिवस वाढत असलेल्या हुंडा बळीच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. व महिला आणि मुलींना आपल्या हक्कासाठी लढण्याची तयारी ठेवा व अन्याय, अत्याचाराविरू ध्द कायद्याची मदत घ्या असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे यांनी आजही समाजाक मुलगी नको हाच विचार आहे. मुलींना शिकावा कर्तृत्ववान बनवा आईवडीलांना सुध्दा त्यांचा अभिमान वाटेल असे सांगितले. यावेळी अनिता ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल चौधरी यांनी केले. तर संचालन प्रा.पुजा चावरे व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सुचित्रा पाटणे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.सोनाली बन्सोड, प्रा.स्नेहा पानतावणे, प्रा.महेशकर , प्रा.मानकर, प्रा.पाटणे व मोठ्या संख्येनी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Determine that marriage will not take the boy who is taking the dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.