समृद्धी महामार्गामुळे शेतकºयांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:23 PM2017-11-07T23:23:07+5:302017-11-07T23:23:18+5:30
कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : कॉँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात देशाने प्रगती केली नाही, तेवढी प्रगती मतदारांनी भाजपावर विश्वास टाकून निवडून दिलेल्या भाजपा सरकारने केली आहे. राज्य सरकारने शेतकºयांच्या व प्रामुख्याने विदर्भाच्या विकासाकडे लक्ष देत समृद्धी मार्ग व जलयुक्त शिवार योजना राबविली. या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व पर्यायाने विदर्भातील शेतकºयांचा विकास होणार आहे, असे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
विश्राम गृहातील पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने उल्लेखनीय कामगिरी केली. तीन वर्षांपूर्वी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे सरकार होते. त्यांनी जे खड्डे करून ठेवले, ते बुजविण्याचे काम भाजपा शासन करीत आहे. भाजपा सत्तेत आल्यावर ३ वर्षांत शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची त्यांनी माहिती दिली. पत्रपरिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, न.प. अध्यक्ष शीतल गाते, शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा चिटणीस नितीन बडगे, ओबीसी मंडळाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल चोपडा यांनी केले.
होय, हे जनतेचे सरकार आहे
आर्वी - फडणवीस सरकार काँगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यात यशस्वी झाले. शेतकरी हा केंद्रबिंदू असून शिवाजी महाराज कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना ऐतिहासिक कर्जमाफी देऊन तसेच शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे, असे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन वर्षांच्या वचनपूर्ती केल्याच्या निमित्ताने येथील विश्रामगृहात पत्रपरिषद पार पडली.
आॅनलाईन अर्ज दाखल केल्याने, कर्जमाफीचे लाभार्थी आधार कार्ड सोबत जोडल्याने शेतकºयांनाच लाभ मिळणार आहे. कॉंग्रेसच्या काळात झालेली धनाढ्य, बोगस शेतकºयांना ही कर्जमाफी मिळणार नाही. फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेद्वारे राज्यातील २६४ गावांतील ४१,९९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. २०१८ मध्ये १३८ गावांत ही योजना राबविली जाणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळावर कायम मात करणार आहे, असे सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार दादाराव केचे, माजी खासदार विजय मुडे, अनिल जोशी, नीता गजाम, धर्मेंद्र राऊत, विजय बाजपेयी, मिलिंद हिवाळे, विनय डोळे, राजू राठी, नंदू थोरात, राजा गिरीधर, हिवसे आदी उपस्थित होते.