केळझरचा विकास आराखडा तयार करावा

By Admin | Published: March 7, 2017 01:14 AM2017-03-07T01:14:01+5:302017-03-07T01:14:01+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर हे गाव दत्तक घेतले आहे.

The development plan for Kelzer should be prepared | केळझरचा विकास आराखडा तयार करावा

केळझरचा विकास आराखडा तयार करावा

googlenewsNext

शैलेश नवाल : आढावा बैठकीतील सूचना
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर हे गाव दत्तक घेतले आहे. गावाच्या संपूर्ण विकासासाठी ग्रामविकास आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत केळझरच्या विकास आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला आ. डॉ. पंकज भोयर, सेलूचे तहसीलदार रवींद्र होळी, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक इलमे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभूर्णे, केळझरचे सरपंच उपस्थित होते. विदर्भातील अष्टविनायकापैकी एक वरदविनायक म्हणून केळझरच्या गणपतीची ओळख आहे. जागृत गणेश मंदिर व नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. जानेवारी पौष संकष्ट चर्तुर्थीला येथे एक दिवसाची यात्रा भरते. तसेच गणेशोत्सवादरम्यान विदर्भातील भाविक वरद विनायकाच्या दर्शनाला येत असतात. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपये प्राप्त होणार आहे. यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करताना गणपती मंदिराच्या आसपासचा परिसर, पथदिवे, सोलर पॅनल, पाण्याची व्यवस्था आणि रस्ते यांचा समावेश करावा. दत्तकग्राम योजनेंतर्गत सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, अशा पद्धतीने इमारतीचे बांधकाम करून त्याला ग्रामभवन असे नाव द्यावे. पाणी पुरवठा योजना ही ४० वर्षे जुनी असून पाईपलाईनची दुरूस्ती तसेच आणखी ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीची व्यवस्था १४ व्या वित्त आयोगातून करावी. गणपती मंदिराला लागून असलेल्या तलावातील गाळ काढून त्यातून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आ.डॉ. भोयर यांनी शहीद स्मारक ते बौद्धविहारपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करून द्यावा. प्रस्ताव अर्थसंकल्पिय अधिवेशनात मंजूर करून घेता येईल. केळझर येथे बस थांबा असून बऱ्याच बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे निर्दशनास आणून दिले. याबाबत एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रकांनी दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांनी दिल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)

कामांचा दर्जा राखण्याचे निर्देश
गावातील अंतर्गत रस्ते तयार करताना त्यामध्ये दुभाजक तयार करू नयेत. केळझरमध्ये होणाऱ्या विविध उत्सवासाठी एकच मोक्याची जागा निश्चित करून त्याच ठिकाणी सर्व उत्सव घेण्यात यावेत. केळझर येथे विविध ठिकाणी पुरातन मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी एक संग्रहालय तयार करून सर्व मूर्ती एकत्र ठेवून त्यांचे व्यवस्थित जतन करून ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. पीर बाबा टेकडीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे. केळझर हे ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्रात येत असल्याने पर्यटन विकास कामासाठी ३ कोटी ८५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यातून होणारी विकास कामे जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी एनआयटीला नेमण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

Web Title: The development plan for Kelzer should be prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.