धनगर समाजबांधव आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:48 PM2018-12-18T23:48:15+5:302018-12-18T23:48:43+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना भाजपा जर सत्तेवर आली तर धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार आहो असे लिखीत आश्वासन दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना भाजपा जर सत्तेवर आली तर धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार आहो असे लिखीत आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत येऊन चार वर्षांचा कालावधी लोटत असताना धनगर समाजाला आरक्षाणाची अंमलबजावणी केली नाही. या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये धनगर आरक्षाणाबाबत हमी देण्यात आली आहे. मेगा भरतीच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे. जोपर्यंत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत मेगा भरती करण्यात येवू नये. मेगा भरती आता जर केली तर धनगर समाज बांधवांवर हा एकप्रकारे अन्यायच होईल. याविषयी येत्या १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्यात यावा. अन्यता तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना प्रकाश भोयर, राजेंद्र पुनसे, अरूण बांबाडे, रामकृष्ण साभांरे, धनराज वंजारी, गजेंद्र कापडे, प्रशांत हुलके, हितेंद्र बोबडे, सुनील उपासे, दिलीप उपासे, नरेंद्र ढवळे, पवन खुजे, गुणवंत बगाडे, राजू घामसे, किशोर भोकर, संतोष महाजन आदींची उपस्थिती होती.