आरक्षणासाठी धनगर समाजाचा खासदारांच्या निवासस्थानी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:04 AM2019-02-18T00:04:44+5:302019-02-18T00:05:32+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. खासदार तडस यांनी निवडणुकीपूर्वीच धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार असून सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचे चर्चा करताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापूर येथील जाहीर सभेत धनगर समाजाला आम्ही सत्तेवर आल्यानंतर एस.टी.प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला मतदान न करण्यासह उपोषणाचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला.
यावेळी संस्थेचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस जितू गोरडे, विनायक नन्नोरे, सचिव कवडू बुरंगे, रामेश्वर लांडे, राम ढोले, सुधाकर उघडे, उद्धव ढोकणे, माणिक बुरांडे, सुनील उपासे, दिवाकर धवने, केशव नन्नोरे, बाळकृष्ण गराड, अमित सरोदे, सचिन ढोले, गोविंद पांगुळ, दिलीप ढोले, उमेश लहाने, विजय घोडे, किशोर ढवळे, राम खुजे, सुरेश नन्नोेरे, सुनील नन्नोरे, वैभव ढाले, लक्ष्मण नन्नोरे, माणिक खराबे, रवी ढामसे, भुजंग ढवळे, अजय नन्नोरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.