धोची वाळूघाटातील पाण्याचा प्रवाहच वळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:20 PM2019-07-18T22:20:34+5:302019-07-18T22:21:04+5:30

हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष्यात धोका होण्याची शक्यताही बळावली आहे.

Dhokha diverted the flow of water from the Vallaghat | धोची वाळूघाटातील पाण्याचा प्रवाहच वळविला

धोची वाळूघाटातील पाण्याचा प्रवाहच वळविला

Next
ठळक मुद्देवाळूमाफियांचा धुडगूस : दोन बोटींच्या सहाय्याने होतोय अवैध उपसा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/पोहणा : हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष्यात धोका होण्याची शक्यताही बळावली आहे.
पहिल्या टप्प्यात झालेल्या आठ घाटांच्या लिलावापैकी हा एक वाळू घाट असून या घाटाची सर्वाधिक बोली लागली. आठही घाटाच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५१ रुपयांचा महसूल मिळाला. त्यापैकी तब्बल २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयांचा महसूल एकट्या धोची वाळूघाटाने दिला आहे. या घाटात सर्वांत जास्त ६ हजार १८४ ब्रास वाळू असल्याचा अंदाज ठरविण्यात आला होता.
त्यामुळे जास्त वाळूसाठा असल्याने आतापर्यंतच्या वाळूघाटाच्या लिलावाच्या इतिहासात पहिल्यांच बोली अडीच कोटींवर गेली. हा घाट आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्टस् लि. या कंपनीच्या नावाने असून येथून वाळू उपसा करण्याचा कंत्राट बुरांडे व साटोणे नामक व्यक्तींनी घेतल्याचे नुकताच घडलेल्या घटनेवरून उघडकीस आले आहे. वाळूउपसा करण्याचा कंत्राट घेणाऱ्यांनी या नदीपात्रात नियमबाह्य दोन बोटी लावून दिवस-रात्र वाळूउपसा चालविला.
परिणामी, नदीपात्रही धोक्यात आले. गावातून वाहतूक बंद करण्याकरिता नागरिकांनी वाहने अडविल्याने झालेल्या चाकू हल्ल्यानंतर प्रशासनालाही जाग आली. त्यांनी लगेच घाटाकडे धाव घेत बोटी जप्त करण्याच्या कारवाईसाठी धडपड चालविली.
महसूल-पोलीस प्रशासनाने मिटलेय डोळे
लिलावानंतरच्या काळात वाळू उपस्यावर बंदी आली होती. ती बंदी उठवून अटी व शर्तीच्या अधिन राहून वाळूउपसा करण्याचे निर्देश घाटधारकांना दिले होते. परंतु, अद्याप घाटधारकांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे धोची घाटावरील प्रकारावरून निदर्शनास आले आहे. बोटी व जड वाहनांना घाटात प्रवेश निषिद्ध असतानाही या घाटात राजरोसपणे नियम धाब्यावर बसवून वाळूउपसा सुरू होता. परंतु, आतापर्यंत याकडे हिंगणघाटच्या महसूल विभागाचे आणि पोलिसांचेही कसे लक्ष गेले नाही, हे न उलगडणारे कोडेच आहे.
आता तरी प्रशासनाला जाग येईल का?
वाळूघाटातून वाळू भरून निघालेल्या जड वाहनांमुळे गावकऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे गावकºयांनी दुसºया मार्गाने वाहतूक करा, असे सांगण्याकरिता वाहने अडविली, तर त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी मुजोर घाटधारक बुरांडे याने त्यांच्यावर चाकू हल्ला करून ज्ञानेश्वर इंगळे याला जखमी केले. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूघाटधारक गावकºयांच्या जिवावर उठले आहेत, त्यामुळे आता तरी कठोर कारवाई करणार काय? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
हल्लेखोराला अटक
वाळूघाटधारक आकाश उर्फ अक्षय दिनेश बुरांडे रा. धानोरा याला वडनेर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, असे ठाणेदार गजभिये यांनी सांगितले.
 

Web Title: Dhokha diverted the flow of water from the Vallaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.