शिबिरात ६६४ रुग्णांचे रोगनिदान
By admin | Published: September 5, 2016 12:41 AM2016-09-05T00:41:24+5:302016-09-05T00:41:24+5:30
येथील दिपचंद चौधरी विद्यालय व विदर्भ प्रदेश विकास परिषद यांच्यावतीने रोगनिदान शिबिर घेण्यात आले.
दीपचंद चौधरी विद्यालय व विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे आयोजन
सेलू : येथील दिपचंद चौधरी विद्यालय व विदर्भ प्रदेश विकास परिषद यांच्यावतीने रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६६४ जणांची तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आले.
मंचावर ज.ने. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी उदय मेघे, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष विलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील नागरिकांची मोफत तपासणी करुन आरोग्य सेवा देण्यात आली. सर्वविभागाचे तज्ज्ञ उपस्थित होते. यापैकी २१८ रुग्णांना दीर्घ उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. ईसीजीकरिता २८, एच.बी. करिता १०, आर.बी.एस.करिता २५ रुग्णांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण भागात रुग्णालयाचा अभाव, आर्थिक अडचण पाहता हा उपक्रम माजी खासदार दत्ता मेघे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात सर्वतोपरी राबविणार असल्याचे उदय मेघे यांनी यावेळी सांगितले. विलास कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगर परिषदेचे अध्यक्ष राजू जयस्वाल, मंगेश चोरे, उल्हास रणनवरे, लता ईखार, डॉ. अभय मुडे, डॉ. आशिष शर्मा, डॉ. अभिषेक जोशी, हरिष पारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांनी शिबिराला सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)