माणसामाणसांतील भेद, विश्वशांतीतील अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:31 PM2019-05-02T21:31:41+5:302019-05-02T21:33:24+5:30

आपणास खऱ्या अर्थाने माणूसपण राखायचे असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खात समरस व्हावयास पाहिजे. आपण दुसऱ्यास समजून घ्यायला पाहिजे, तरच ते तुमची किंमत करेल. माणसाचे मोठेपण मर्यादित जीवनात नाही, ते सामूहिक जीवनात आहे. प्रार्थना ही आपल्यासाठी मांगल्य निर्माण करते.

Differences between people, world problems | माणसामाणसांतील भेद, विश्वशांतीतील अडचण

माणसामाणसांतील भेद, विश्वशांतीतील अडचण

googlenewsNext
ठळक मुद्देएस. एन. सुब्बाराव : आयटीआय टेकडी परिसरात ग्रामजयंती समारोप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपणास खऱ्या अर्थाने माणूसपण राखायचे असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खात समरस व्हावयास पाहिजे. आपण दुसऱ्यास समजून घ्यायला पाहिजे, तरच ते तुमची किंमत करेल. माणसाचे मोठेपण मर्यादित जीवनात नाही, ते सामूहिक जीवनात आहे. प्रार्थना ही आपल्यासाठी मांगल्य निर्माण करते. आज माणसामाणसात भेद हा विश्वशांतीत सर्वांत मोठी अडचण असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आह, असे विचार ज्येष्ठ गांधी विचारक तथा राष्ट्रीय युवा योजना निदेशक डॉ. एस. एन. सुब्बाराव, नवी दिल्ली यांनी सामुदायिक प्रार्थनेविषयी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक बचत गट, गुरुदेव सेवा मंडळ व निसर्ग सेवा समितीच्या वतीने संयुक्तरीत्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती ग्रामजयंती समारोपीय कार्यक्रमाचे आॅक्सिजन पार्क, निसर्ग हिल्स आयटीआय टेकडी परिसरात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी इंजि. भाऊ थुटे, बाबाराव राऊत, मोहन अग्रवाल, प्रदीप दाते, डॉ. राम ठोंबरे, प्रकाश येंडे उपस्थित होते.
१ एप्रिल ते २९ एप्रिल संपूर्ण महिन्यात घरोघरी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ३० एप्रिलला सकाळी सामुदायिक ध्यान परिपाठ व प्रभातफेरी काढण्यात आली. दीपोरीचे हेमंत टाले यांनी ध्यानाचे महत्त्व विशद केले.
प्रमोदिनी मनोहरराव कोरडे स्मृतिप्रीत्यर्थ, ग्रामजयंती महोत्सव निमित्ताने यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ. सुब्बाराव यांनी वयाच्या ८७ वर्षीही आपल्या भारदस्त आवाजात एक दुलारा देश हमारा प्यारा हिंदुस्तान गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
ज्येष्ठ नागरिक बचत गटाचे अध्यक्ष बाबाराव राऊत, जेष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, प्रदीप दाते, डॉ. राम ठोंबरे, प्रकाश येंडे, यांनी ग्रामजयंतीवर आपले अनुरूप असे विचार व्यक्त केले.
प्रदीप दाते यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीत निवड झाली त्याबद्दल व वृक्षमित्र हेमंत टाले दिपोरी, देहदान संकल्प करणाºयाचा ग्रामगीता देऊन डॉ. सुब्बाराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निरंजनअप्पा एरकेवार, तर बा. दे. हांडे व डॉ. शोभा बेलखोडे यांनी संचालन केले.
पतंजली योग प्रशिक्षण वर्धा जिल्हाध्यक्ष दामोदर राऊत व रवी खाडे यांनी वातावरण निर्मितीकरिता साधारण असेच गीत सादर केले. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शेख हाशम, चंद्र्रशेखर दंढारे, रामभाऊ सातव, शोभा लंगडे, बाबाराव सावरकर, रमेश खुरगे, अरविंद भोयर, विजय ढोकळा, सुरेशचंद्र मांढळे, नरेश, ज्योती, अशुभ अग्रवाल देवळी, प्रकाश कदम, अ‍ॅड. भोयर, अमृता मडावी उपस्थित होते. उपस्थितांनी आॅक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता रितेश निमसडे, अविनाश भडे, विकास देशमुख, सागर मसराम, विठ्ठल गेडाम, डॉ. विक्रम बेलखोडे, शरयू आदींनी सहकार्य केले. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला बचत गट, गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Differences between people, world problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.