बैलपोळ्याच्या जागेवरून मतभेद
By admin | Published: September 12, 2015 02:00 AM2015-09-12T02:00:27+5:302015-09-12T02:00:27+5:30
येथे परंपरेप्रमाणे वर्षानुवर्षापासून आठवडी बाजार परिसरात भरणारा बैलपोळा बाजार समितीच्या परिसरात...
तहसीलदारांच्या मध्यस्थीने निघाला मार्ग
सेलू : येथे परंपरेप्रमाणे वर्षानुवर्षापासून आठवडी बाजार परिसरात भरणारा बैलपोळा बाजार समितीच्या परिसरात हलविण्यासाठी नगरपंचायत प्रशासक तथा तहसीलदाराकडे काहींनी अर्जाद्वारे मागणी केली होती. यामुळे पोळ्याच्या उत्सवातही राजकारण होवू पहात असताना वातावरण बिघडण्याची शक्यता होती. तहसीलदारांनी पोळा भरत असलेल्या जागेची पाहणी करून ‘जैसे थे’ चा निर्णय दिला.
ग्रामपंचायतीच्यावतीने येथील आठवडी बाजारात पोळा भरत आला आहे. या पोळ्याचे आयोजन ग्रामपंचायतद्वारे होत होते. शासननिर्णयानुसार ग्रामपंचायत बरखास्त होवून नगरपंचायतीचा निर्णय झाला. सेलू येथील माजी सरपंच राजेंद्र मिश्रा व ग्रा.पं. सदस्य शैलेंद्र दप्तरी यांनी पोळा बाजार समिती परिसरात स्थानांतरीत करण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले. तहसीलदार डॉ. रवींद्र कोळी यांनी तक्रारकर्त्यांसह सरपंच डॉ. राजेश जयस्वाल यांच्यासह आठवडी बाजाराची पाहणी केली व बैलपोळा स्थानांतरण न करता जुन्याच ठिकाणी भरविण्याची सूचना केल्याने मार्ग निघाला.(तालुका प्रतिनिधी)