जिल्हा प्रशासन अन् पोर्टलवरील आकडेवारीत तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 05:00 AM2021-05-19T05:00:00+5:302021-05-19T05:00:16+5:30
सोमवार, दि. १७ मे रोजी वर्धा जिल्ह्यात नवीन ३०० कोविडबाधित सापडल्याचे तसेच तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आणि ५६२ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याचे संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय १ हजार १४७ कोविड चाचण्या करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे; तर याचदिवशी जिल्हा प्रशासनाकडून मागील २४ तासांत जिल्ह्यात ८८१ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर ११० नवीन कोविडबाधित सापडल्याचे व त्यापैकी आठ कोविडबाधित जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात कोरोनाची एन्ट्री झाल्यापासून प्रत्येक कोविड बाधितासह कोरोनामुक्त तसेच कोविड मृतांची नोंद प्रशासन घेत आहे. शिवाय ती माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपडेट केली जात आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीत आणि संकेत स्थळावरून जाहीर होत असलेल्या आकडेवारीत मोठी तफावत येत असल्याने नेमकी खरी माहिती कुठली, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे.
सोमवार, दि. १७ मे रोजी वर्धा जिल्ह्यात नवीन ३०० कोविडबाधित सापडल्याचे तसेच तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आणि ५६२ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याचे संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय १ हजार १४७ कोविड चाचण्या करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे; तर याचदिवशी जिल्हा प्रशासनाकडून मागील २४ तासांत जिल्ह्यात ८८१ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर ११० नवीन कोविडबाधित सापडल्याचे व त्यापैकी आठ कोविडबाधित जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर एकाचदिवशी ३५० व्यक्ती कोविडमुक्त झाले. तसेच कोरोनामुळे १८ व्यक्तींचा मृत्यू झाला.
त्यापैकी तीन व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच संकेतस्थळ आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या माहितीत तफावत येत असल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोविड बाधितांच्या आकडेवारीत तफावर येत असल्याने आरोग्य विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कोविडमुक्त झालेत किती?
nसोमवारपर्यंत जिल्ह्यातील ३८ हजार ९५५ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले; पण याचदिवशी संकेतस्थळावर ४६ हजार २६१ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोविडमुक्त किती व्यक्ती झालेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चाचण्यांच्या आकडेवारीत तफावत
- सोमवारपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार ३२९ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावर सोमवारपर्यंत वर्धा जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ९२५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे.
मृतांच्या आकडेवारीत ३५० ने फरक
सोमवार, दि. १७ मे रोजीपर्यंत जिल्ह्यातील १ हजार १५५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावर केवळ ८०५ कोविड मृतांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे संकेतस्थळावरील माहिती तातडीने आणि वेळोवेळी अपडेट करण्याची गरज आहे.
कोविडबाधितांच्या संख्येतही फरक
- जिल्हा प्रशासनाने सोमवारपर्यंत जिल्ह्यातील ४४ हजार ४८३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद घेतली आहे. असे असले तरी, संकेतस्थळावर ५३ हजार ३१४ कोविड बाधितांची नोंद असल्याचे दिसून येते.