ईपीएस ९५ अंतर्गत सेवानिवृत्ती वेतनधारकांचे डिजीटल लाईव्ह सर्टिफिकेट
By admin | Published: January 2, 2017 12:14 AM2017-01-02T00:14:40+5:302017-01-02T00:14:40+5:30
असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवा निवृत्तीनंतर तुटतुंजे सेवानिवृत्ती वेतन मिळत असून ते वेळेवर मिळेलच याचीही शाश्वती नाही.
भविष्य निर्वाहनिधी पथक सोमवारी पुलगावात होणार दाखल
प्रभाकर शहाकार पुलगाव
असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवा निवृत्तीनंतर तुटतुंजे सेवानिवृत्ती वेतन मिळत असून ते वेळेवर मिळेलच याचीही शाश्वती नाही. कधी दस्ताऐवजाअभावी तर कधी कुठल्या कारणास्तव अडचणी निर्माण होतात. त्या कायमच्या दूर व्हाव्यात व अशा कामगारांना डिजीटल लाईव्ह सर्टिफिकेट मिळावे यासाठी भविष्य निर्वाह निधी आयुक्त, नागपूर येथील पथक २, ३ व ४ जानेवारी असे तीन दिवस राष्ट्रीय मील मजदूर संघाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे.
या तीन दिवसीय शिबिरात पुलगाव कॉटन मील, परिवहन मंडळ, राज्य विद्युत महामंडळ, सहकारी जिनिंग फेडरेशन व इतर उद्योगामधील सेवा निवृत्तीधारकांनी या शिबिराचा लाभ घेण्याकरिता सेवानिवृत्त कामगारांनी येताना सोबत आधार कार्डची छायांकित प्रत, पीपीओ क्रमांक, बँक पासबुक, मोबाईल नंबर सोबत आणणे अनिवार्य आहे. या कागदपत्राच्या आधारावर डिजीटल लाईव्ह सर्टिफिकेट बनणार आहे.
असंघटीत क्षेत्रातील १८६ उद्योगातील लाखो निवृत्ती कामगारांच्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ करावी यासाठी संघटनेतर्फे शासनाशी लढा सुरूच आहे. या सेवेचा लाभ घेताना भविष्यात त्रास होवून नये म्हणून संबंधित कामगारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ई.पी.एस. ९५ संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, राष्ट्रीय मील मजदूर संघाचे अध्यक्ष रामेश्वर वाघ, मो. युनुस यांनी केले.