आधी केली जेवणाची व्यवस्था, आता धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:21+5:30

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने जिल्हा प्रशासनाला विनंती करून एका निवारात असलेल्या बाहेरगावच्या कष्टकरी बांधवांना जेवण वितरणाच्या जबबादारी घेतली. आता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रत्यक्ष जेवण देण्याचे नियाजन सध्या शक्य नाही. मात्र, नागरिकांनी दिलेल्या योगदानाचा विनियोग गरजू बांधवांसाठी होणे गरजेचे असल्याने शहरालगतच्या किंवा शहरापासून काही अंतरावर शेतात,......

Dining arrangements made earlier, now distribute grain | आधी केली जेवणाची व्यवस्था, आता धान्य वाटप

आधी केली जेवणाची व्यवस्था, आता धान्य वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुजींच्या आवाहनाला वर्धेकरांची साद : म.रा.प्रा. शिक्षक समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी बाहेर जिल्ह्यातील मजूर अडकून पडले आहे. प्रशासनाकडून त्यांची निवारागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. अशा आश्रित कष्टकरी बांधवांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला वर्धेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता शिक्षण समितीकडून जेवणाची व्यवस्था पूर्ण करीत गरजूंना धान्य वाटपाचा कार्यक्रमही हाती घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने जिल्हा प्रशासनाला विनंती करून एका निवारात असलेल्या बाहेरगावच्या कष्टकरी बांधवांना जेवण वितरणाच्या जबबादारी घेतली. आता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रत्यक्ष जेवण देण्याचे नियाजन सध्या शक्य नाही. मात्र, नागरिकांनी दिलेल्या योगदानाचा विनियोग गरजू बांधवांसाठी होणे गरजेचे असल्याने शहरालगतच्या किंवा शहरापासून काही अंतरावर शेतात, रस्त्याच्या कडेला असणारे ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, पाल टाकून राहणारे व शिधापत्रिका नसल्याने कोणतीही मदत मिळाली नसल्याने भटकंती करणारे किंवा निराश्रित, निराधार, दिव्यांग आणि अजूनही ज्यांच्यापर्यंत अद्यापही कोणतीही मदत पोहोचली नाही, अशांची खात्रीशीर माहिती घेऊन जीवनावश्यक विविध वस्तूंची कीट पुरविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामध्ये गव्हाचे पिठ ५ किलो, तांदूळ ५ किलो, तूर डाळ १ किलो, चणा डाळ १ किलो, खाद्य तेल १ लीटर, साखर २ किलो, तिखट ५०० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, मीठ १ किलो, चहापत्ती १२५ ग्रॅम, साबण पावडर ५०० ग्रॅम, स्नानाची साबण १, कपडे धुण्याची साबण या वस्तूंचा समावेश आहे. ही एक किट ८३३ रुपयाची आहे. या किट तयार करण्याचे काम सुरु असून त्या गरजूंपर्यंत पोहोचविल्या जात आहे. गुुरुवारी रात्री सेवाग्राम मांडगाव मार्गावर ऊसतोडणी कामगार ७ आणि बंद असलेल्या वीट भट्टीवरील ८ गरजू अशा १५ कष्टकरी कुटूंबीयांना वस्तू वितरित करण्यात आल्या. गरजू कुटुंबीयांना आवश्यक वस्तू देण्यापूर्वी त्या परिसरातील परिचित मंडळी आणि शिक्षक बांधव तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, युवकांना विचारणा करून आणि मदत पोहोचली नसल्याची खात्री झाल्यानंतरच वितरण केल्या जात आहे.
 

Web Title: Dining arrangements made earlier, now distribute grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.