‘कंटेनर पॅक’ऐवजी प्लास्टिकच्या पन्नीत जेवण

By admin | Published: July 7, 2015 01:36 AM2015-07-07T01:36:10+5:302015-07-07T01:36:10+5:30

वेळ सकाळी ११.३० वाजताची. शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर थांबली.

Dinner in the plastic container instead of 'container pack' | ‘कंटेनर पॅक’ऐवजी प्लास्टिकच्या पन्नीत जेवण

‘कंटेनर पॅक’ऐवजी प्लास्टिकच्या पन्नीत जेवण

Next

सुक्याऐवजी बटाटे रश्श्याची भाजी : पुऱ्यांचा आकारही बुचकळ्यात पाडणारा
वर्धा : वेळ सकाळी ११.३० वाजताची. शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर थांबली. यातील एका प्रवाश्याने येथील कॅन्टीनमधून जनता खाना विकत घेतला. त्याला ते पार्सल २० रुपयात मिळाले. जेवण ‘कंटेनर पॅक’मध्ये देण्याचा नियम असलेले हे पार्सल त्या प्लास्टिकच्या पिशवीत देण्यात आले. यात पन्नीत सात पुऱ्या व रस्सा असलेली भाजी होती. या भाजीला गंध येत होता. यावरून रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या जेवणाचा दर्जा काय, याचा खुलासा झाला.
प्रवाश्यांना देण्यात येत असलेल्या जेवणाचा उर्जा उत्तम ठेवण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. असे असताना कंत्राटदाराकडून सर्व निकष पायदळी तुडविल्या जात असल्याचे येथे दिसून आले. १५ रुपये किंमत ठरविलेल्या या जनता खानाच्या पार्सलमध्ये प्रवाश्यांना सात पुऱ्या, १२५ ग्रॅम आलूची सुकी भाजी, लोणचे आणि हिरवी मिरची देण्याचे दंडक आहे.
प्रवाश्याला देण्यात आलेले हे पार्सल सदर जेवण स्टेशन प्रबंधकांना दाखविले असता तेही अवाक् झाले. स्टेशन प्रबंधक जे.डी. कुलकर्णी व तेथील तिकीट निरीक्षकांनी जेवणाची पाहणी केली असता ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले. जनता खाना ही योजना आर. के. अग्रवाल मुंबई या कंत्राटदार कंपनीमार्फत राबविली जात आहे. वर्धा रेल्वे स्थानकावरील कंत्राटदार कंपनीचे काम खान नामक व्यवस्थापक पाहत आहे. स्टेशन प्रबंधकांनी निकृष्ट जेवणाचे निरीक्षण करताना सदर व्यवस्थापकास बोलविले; पण तो उपस्थित नसल्याने त्यांच्या अधिनस्थ कर्मचारी तेथे हजर झाला. यावेळी त्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याने जेवण १५ रुपयांतच विकले जात असल्याची खोटी माहिती पुरविली; पण पुऱ्या आणि सुकी भाजी दिली जात नसल्याची कबुली यावेळी देण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)


आर.के. अग्रवाल या कंत्राटदार कंपनीकडून रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. सदर कंत्राटदार निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे या प्रकरणात कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे कंत्राटही रद्द केले जाणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी चौकशीलाही सुरूवात झाल्याचे ते म्हणाले. शिवाय वर्धेचे खासदार व रेल्वे बोर्डाचे सदस्य रामदास तडस यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशीचे निर्देश दिलेत.

वर्धा रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या गोरखधंद्याची माहिती मिळाली. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
- रामदास तडस, खासदार तथा रेल्वे बोर्ड सदस्य

आर.के. अग्रवाल यांच्याकडून वर्धा रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. यातील जनता खाना योजनेत निकष डावलण्यात येत असल्याने त्यांना नोटीस बजावली जाईल. निकृष्ट जेवण देणे व अधिक पैसे घेतल्याप्रकरणी कारवाई कठोर होईल.
- जे.डी. कुलकर्णी, स्टेशन प्रबंधक, रेल्वेस्थानक, वर्धा.

Web Title: Dinner in the plastic container instead of 'container pack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.