पोलिसांनी नोंदविले संचालक व दुध उत्पादकाचे बयान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:24 PM2018-04-14T22:24:49+5:302018-04-14T22:24:49+5:30
दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेतील ५.५१ लाखांच्या अपहार प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा ठाणेदार रामटेके यांनी दुग्ध संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक व दुध उत्पादकांचे बयान नोंदवून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेतील ५.५१ लाखांच्या अपहार प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा ठाणेदार रामटेके यांनी दुग्ध संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक व दुध उत्पादकांचे बयान नोंदवून घेतले.
लेखा परीक्षक सुभाष मोरे यांच्या तक्रारीवरून संस्थेचे माजी अध्यक्ष दीपक बावणकर यांच्यावर कलम ४२०, ४०९, ४७७ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रामटेके यांनी यापूर्वी संस्थेच्या कार्यालयात जाऊन रेकॉर्ड जप्त केला होता. त्या अनुषंगाने शनिवारी संस्थाध्यक्ष मनोहर राऊत, उपाध्यक्ष सुरेश भालेराव, संचालक सुभाष ताल्हण, पद्माकर देशमुख, नरेशचंद्र गोमासे, नितीन गायकी, अमोल ढोणे, रूपराव मोरे, मकबुल खॉ पठाण, नंदा गोमासे, सचिव प्रकाश किरनाके, लिपीक आनंदराव बालपांडे, भाष्कर बाकडे यांचे बयान नोंदवून घेतले. दुध उत्पादक पुरूषोत्तम गुबरे, विलास डंभारे, शंकर सरोदे, अनिल कोंडलकर, गणेश तिवसकर, पद्माकर तिवसकर, स्वप्नील कुटेमाटे, दिनेश आंबटकर यांचेही बयान पोलिसांनी नोंदवून घेतले. यावेळी दुधाच्या चुकाºयाचे २ लाख ३८ हजार ४६६ व एक रुपया प्रती लिटर ठेवीच्या १ लाख ८३ हजार ६२३ रुपयांचा अपहार झाल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले. यात ठाणेदार रामटेके, प्रीतम इंगळे, अमर हजारे, किशोर बमनोटे यांनी बयान नोंदविले.