कर्मचारी नसल्याने खातेदारांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:44 AM2017-09-23T00:44:50+5:302017-09-23T00:45:05+5:30
येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. बँकेच्या कामकाजाची वेळ सकाळी १०.३० वाजता असताना ११ वाजेपर्यंत बँकेचा एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. बँकेच्या कामकाजाची वेळ सकाळी १०.३० वाजता असताना ११ वाजेपर्यंत बँकेचा एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर नव्हता. त्यामुळे खातेदारांची ताटकळ झाली. शिवाय गर्दी वाढल्याने कार्यालयासमोर रांग लागली होती. पर्यायी व्यवस्था नसल्याने खातेदारांना वेठीस धरले जात आहे अशा प्रतिक्रीया यावेळी उमटल्या.
बँकेत उपस्थित चपराशीकडे विचारणा केली असता अधिकारी वर्धा शाखेत कॅश आणण्यास गेल्याचे सांगितले. पवनार येथील शाखेचा विस्तार मोठा असून या शाखेशी गोंदापूर, कान्हापूर, रमना, वाहितपूर, मोर्चापूर येथील खातेदार जोडले आहे. दररोज लाखोंची उलाढाल होते. बचत गट, निराधार, पेन्शनधारक, शिष्यवृत्ती, ब्रह्म विद्या मंदिर हे देखील या बँकेचे खातेधारक आहेत. मात्र येथील शाखा चार कर्मचाºयांच्या आधारे चालविली जात आहे. जागा अपुरी असल्याने खातेधारकांची अडचण होते.