‘लोकतंत्र आणि महात्मा’ व ‘मिटती खेती उजडता किसान’वर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:29 PM2018-02-16T22:29:13+5:302018-02-16T22:29:37+5:30

येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत.

Discussion on 'Democracy and Mahatma' and 'Deficible Farming Unemployed Farmer' | ‘लोकतंत्र आणि महात्मा’ व ‘मिटती खेती उजडता किसान’वर चर्चा

‘लोकतंत्र आणि महात्मा’ व ‘मिटती खेती उजडता किसान’वर चर्चा

Next
ठळक मुद्देसर्वोदयींचे तीन दिवसीय संमेलन : देशभरातून चार हजार गांधी विचारवंत होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत. शिवाय या संमेलनात ‘लोकतंत्र आणि महात्मा’ तसेच ’मिटती खेती उजडता किसान’ या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती संमेलन संयोजक आदित्य पटनायक यांनी दिली.
पटनायक म्हणाले २०१९ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने या संमेलनाचे महत्त्व काही वेगळे आहे. संमेलनाचे प्रमुख आयोजक सर्वोदय समाज सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सर्व सेवा संघ आहेत. देश व जगात आज सत्य, प्रेम, करूणा, बंधुभाव यावर चालण्याचा मार्ग गांधी विचारातून जातो. त्यामुळे संमेलनाचा विषय वैश्विक आव्हाने व गांधीवादी विकल्प हा ठेवला आहे. समस्येचा विचार करता समाधान गांधी विचार व कार्यातूनच दिसते. त्यामुळे गांधी विचार मानणाºयांची संख्या वाढली. गांधी जयंती जगात यादगार ठरावी याची ही पूर्व तयारी समजायला हरकत नाही. संमेलनात सहभागींची संख्या जास्त असल्याने व्यवस्थेची तयारी जोरात असल्याचे आदित्य भाई यांनी सांगितले. आश्रम परिसरात भव्य सभा मंडप, निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानिक, वर्धा आणि विद्यापीठातील स्वयंसेवक यासाठी मदत करणार आहे.
२३ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुप्रसिद्ध गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेखाली, गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व आयोजक समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात मेधा पाटकर विचार व्यक्त करणार असल्याची माहिती आदित्य पटनायक यांनी बोलताना दिली.

सेवाग्राम येथे होणाऱ्या या संमेलनात देशभरातील गांधी विचारवंत सहभागी होणार आहे. या विचारवंतांना चर्चेदरम्यान कुठलीही अडचण जाणवणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता आयोजन समितीकडून पूरेपुर तयारी करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Discussion on 'Democracy and Mahatma' and 'Deficible Farming Unemployed Farmer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.