ओला दुष्काळ, भूसंपादन अन् घरकुलावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:28+5:30
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कोणत्या उपायोजना करण्यात आल्या या संदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी भिमनवार म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तुलनेत परतीच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यात नुकसान कमी झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खासदार रामदास तडस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर बैठकीत ओला दुष्काळ, घरकुल, सेलडोह येथील महामार्ग क्रमांक ३६१ मध्ये गेलेल्या घरांच्या भुसंपादन विषयावर सविस्तर चर्चा झाली.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कोणत्या उपायोजना करण्यात आल्या या संदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी भिमनवार म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तुलनेत परतीच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यात नुकसान कमी झाले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्या शेतकºयांच्या शेतीचे जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४३ बाधीत गावात ३१० शेतकऱ्यांच्या एकूण ३०२.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यांना मदत मिळावी याकरिता प्रशासनाकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजना राबविण्यात आली आहे. त्याकरिता काही लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटायचे आहे. तसेच लाभार्थ्यांचा प्रलंबीत निधी त्वरीत देण्याची मागणी याप्रंसगी खा. तडस यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. पट्टे वाटपाच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबरला बैठक बोलावण्यात आली आहे. शिवाय प्रलंबीत निधीकरिता शासनाकडे मागणी केल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सेलडोह येथील महामार्ग ३६१ मध्ये गेलेल्या घरांच्या भुसंपादन विषयीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रंलबीत असल्यामुळे त्वरीत निकाली लावण्याचा आग्रह खा. तडस यांनी जिल्हाधिकाºयांना केला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी सदर भुसंपादन (सामान्य) याच्यामार्फत फेरमुल्यांकरण करण्यात आले असून संबधीतांकडून जमीन अवार्ड करुन फेरमुल्यांकनाच्या अनुषंगाने नियमानुसार वाढीव निधी देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी दिली. बैठकीला जयंत कावळे, जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, रवींद्र खोडे, गिरीष कांबळे, उदय मेहुने, रत्नाकर खोडे, संजय इरपाते, सुधीर भुते, नगरविकास अधिकारी शहा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.