वाहन चालक-मालक संघटनेची केंद्रीय मंत्र्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:25 PM2019-06-26T22:25:06+5:302019-06-26T22:25:21+5:30
संघर्ष वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली. व त्यांना चालक-मालकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संघर्ष वाहन चालक-मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली. व त्यांना चालक-मालकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे विदर्भ अध्यक्ष अविनाश केळकर, विदर्भ उपाध्यक्ष किशोर शेंडे, विदर्भ कार्याध्यक्ष राहुल हाडके, संपर्क प्रमुख अनंता देशमुख, वर्धा जिल्हा अध्यक्ष नितीन चौधरी, सचिव योगेश खेडकर, जयंत परिमल, लकी अली, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विरेंद्र कांबळे, रितेश देशमुख, सोपान धरोकार आदी उपस्थित होते. यावेळी नामदार गडकरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देशात विविध राज्यात खासगी वाहन आहेत. पण क्रुझर या गाडीला इतर राज्यात १२ अधिक १ चे मॅक्झी परमिट आहे. इतर वाहन ८ अधिक १ परमिट आहे, तेच महाराष्ट्र राज्यात ९ अधिक १ परमिट आहे. राज्यात क्रु झर गाडीला १२ अधिक १ चे टॅक्सी परमिट व टाटा सुमो, टवेरा, बोलेरो या वाहनांना ९ अधिक १ किंवा ८ अधिक १ परमिट द्यावे, अशी मागणी करण्यात आली. टॅक्सी परमिट वाहनाचा कालावधी हा ८ वर्षे तर प्राव्हेट वाहनाचा कालावधी हा १५ वर्षे आहे. टॅक्सी परमिट वाहनाचा कालावधी हा १५ केला तर फायनान्स व परिवार चालविणे व्यवस्थित पार पडेल. भारतामधील सर्व राज्याचे टॅक्स सारखे करण्यात यावे, अशी मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली.