कपाशीवर रोग, पाने पिवळी पडली; शेतकऱ्यापुढे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:26 PM2024-10-23T17:26:42+5:302024-10-23T17:28:41+5:30

उत्पादनात घट होण्याची शक्यता : उपाययोजना सुचविण्याची मागणी

Disease on cotton, leaves turned yellow; A new crisis infront of the farmer | कपाशीवर रोग, पाने पिवळी पडली; शेतकऱ्यापुढे नवे संकट

Disease on cotton, leaves turned yellow; A new crisis infront of the farmer

लोकमत न्यूज नेटवर्क 
सेलू :
तालुक्यातील अनेक गावांत जोमात वाढलेल्या कपाशीवर रोग आला आहे. सततच्या पावसामुळे कपाशी पीक पिवळे पडले असल्याचा अंदाज जाणकारांचा अंदाज आहे. आणखी पाऊस आल्यास हे पीक हातचे जाण्यासह उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


तालुक्यात हजारो हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर तुरळक झालेल्या पावसाने कपाशी पिकांनी तग धरला. तर ज्याच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी ओलित करून कपाशी जगविली. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी ४० टक्क्यांपर्यंत डोब आली होती. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र, त्यानंतर लागून पडलेल्या पावसाने पिकांची पुरती वाट लावली. सध्या घडला कपाशी फुले पात्यावर आहेत. असे असताना परतीच्या पावसाचा फटका तालुक्याला बसला आहे. 


दिवसा ऊन, रात्री ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेवाळ निर्माण झाले. परिणामी कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, अत्यंतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. असे असताना अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


मार्गदर्शन करण्याची मागणी 
दरवर्षी कपाशीवर व सोयाबीनवर काही ना काही रोग येतो. यंदाही कपाशीवर रोग आला आहे. पाने पिवळी पडत आहे. यंदा जमिनीत चांगल्या पावसामुळे ओलेपणा कायम आहे व ऊनही चांगले तापत आहे. त्यामुळे कदाचित कपाशीवर रोगांनी अटॅक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीची पाने पिवळी पडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वळीच उपायोजना झाल्या नाही तर हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.


संकटाशी दोन हात 
हंगामात अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले. यात कपाशीवर आलेल्या कीडरोगाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. लागवडीला लागलेला खर्च आणि बाजारात मिळणारा हमीभाव यात मोठी तफावत असल्याने संकटाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या आता जिव्हारी लागत असल्याचे बोलले जात आहे.


दिवाळी सणही फिकाच 
दिवाळी सनापूर्वी खरिपातील पीके निघण्यास सुरवात होते. यंदा सोयाबिनने दगा दिला. त्यात भाव पाडून व्यापारी शेतमालाची खरेदी करीत आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण सूनाच जाण्याची चिन्ह दिसून येत आहे. लेकी बाळीला चोरी बांगडी घेण्यासाठी उधार घेण्याची वेळ ओढावली आहे.

Web Title: Disease on cotton, leaves turned yellow; A new crisis infront of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.