पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:39 PM2018-02-11T22:39:06+5:302018-02-11T22:39:21+5:30

माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे.

Disintegration of the water tank | पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा

पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा

Next
ठळक मुद्देडासांचा प्रादुर्भाव : माणिकवाडा ग्रां.प.मध्ये सावळागोंधळ, नालीतील सांडपाणी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : माणिकवाडा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला आहे. घाणीत असलेल्या टाकीतून पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यता आले आहे. पाणी सोडणाºया व्हॉल्व्हमध्ये घाण असल्याने दूषित पाणी नळांना जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावातील नालीमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. याची कल्पना देवूनही ग्रामपंचायत मात्र काहीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
माणिकवाडा गावात सार्वजनिक चौक व मोकळी जागा आहे. गावातील मुख्य बसस्थानक परिसरात असलेली पाणीपुरवठा टाकी पूर्णत: असुरक्षित आहे. टाकीच्या सभोवताल असलेले तारेचे कुंपन तुटलेले आहे. लोखंडी फाटक असून त्याला कुलूप लावल्या जात आहे. पाणी सोडण्यासाठी असलेले व्हॉल्व्ह घाणीने माखले आहे. त्यात दूषित पाणी आहे. सर्र्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे. व्हॉल्व्हकरिता बांधलेल्या टाक्याही घाणीत आहे. शिवाय सांडपाणी सार्वजनिक रस्त्यावरून वाहत आहे. आरोग्य उपकेंद्रासमोरची नाली बुजून पाणी इतरत्र वाहत होते. यात डास निर्माण होत आहे. या त्रासापोटी नाला उपसण्याची मागणी तेथील परिचारीकेने ग्रामपंचायतला दिली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील नाल्या तुंबल्या असून शेखणताचे ढिगारे उघड्यावर आहे. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
मनरेगामधून काम मिळेना
रोजगार हमी योजनेमधून गावकरी रोजगार मागत आहे. त्यांना काम देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. मजुरीचे मस्टरही काढल्या जात नाही. रोजगारसेवक मजुरांना त्रास देतो त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही. रोजगार सेवक मजुरांना त्रास देतो त्याच्यावर कारवाई केल्या जात नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागीतल्यावरही देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे.

Web Title: Disintegration of the water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.