जंक्शन जलवाहिनी फूटल्याने पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:24 AM2019-02-10T00:24:06+5:302019-02-10T00:24:47+5:30
शहरात सध्या भूमिगत गटारवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. असेच खोदकाम आर्वी मार्गावर केळकरवाडी परिसरात सुरू असताना अचानक जंक्शन जलवाहिनी फूटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात सध्या भूमिगत गटारवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. असेच खोदकाम आर्वी मार्गावर केळकरवाडी परिसरात सुरू असताना अचानक जंक्शन जलवाहिनी फूटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. सदर बाब न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्या लक्षात येताच तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या ४८ तासात दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांंकडून व्यक्त केला जात आहे.
वर्धा शहरातील नागरिकांना धामनदीच्या येळाकेळी आणि पवनार येथील पात्रातून पाण्याची उचल करून पाणी पुरवठा केल्या जातो. वर्धा शहरात सध्या अमृत योजनेंतर्गत ठिकठिकाणी भूमिगत गटारवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. असेच खोदकाम काम सुरू असताना स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आर्वी मार्गावर सुरू असताना अचानक जलवाहिनी फुटली. परिणामी, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. विशेष म्हणजे फुटलेली जलवाहिनीही जंक्शन लाईन असून ती फार पूर्वी टाकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर १९९८ पासून तिचे मेंटेनेन्सचे काम निघाले नव्हते. न.प.तील जुन्या कर्मचाºयांकडून या परिसरात जलवाहिनी असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, खोदकाम करताना सुमारे १० मीटरचा अंदाज चुकला. उल्लेखनिय म्हणजे पूर्वीच्या जलवाहिनीचा कुठलाही नकाशा नगर परिषदेकडे नसल्याचे सांगण्यात आले. पूर्वीच शहरातील नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो.