जन्म दाखल्यावरुन वाद; पालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण
By चैतन्य जोशी | Updated: September 14, 2022 17:38 IST2022-09-14T17:36:45+5:302022-09-14T17:38:25+5:30
शासकीय कामकाजात अडथळा : शहर पोलिसात तक्रार

जन्म दाखल्यावरुन वाद; पालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण
वर्धा : नगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कार्यरत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना नगरपालिकेत घडली. याप्रकरणी १३ रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख (३५) हे दिव्यांग असून पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीवर आहे. ते कर्तव्यावर असताना १३ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुजित रमेश धवराठे आणि एक व्यक्ती असे दोघे जण आले आणि मुलांच्या जन्म पत्राची मागणी केली.
आवेस यांनी त्यांना थोडं थांबण्यास सांगून बाजूलाच असलेल्या मॅडमकडून प्रमाणपत्राची प्रत घेण्यास सांगितले. मात्र, दोघांनी अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हेतर जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. मोहम्मद आवेस यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.