३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:12 PM2018-06-04T23:12:58+5:302018-06-04T23:13:18+5:30

यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.

Distribute crop loan to farmers within 30 June | ३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा

३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा

Next
ठळक मुद्देकिशोर तिवारी : पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना ३० जूनच्या आत कर्ज वाटप पूर्ण करावे, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.
तहसील कार्यालयात पीक कर्ज वितरण आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एसडीओ समाधान शेंडगे उपस्थित होते. तिवारी यांनी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आरबीआयच्या नियमापेक्षा अधिक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांना त्रास देतात. याबाबत बँक अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्हाधिकारी नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना आरबीआयचे नियम सांगितले. नियमाप्रमाणे एक लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी केवळ सातबारा, ८- अ आणि ६ क एवढेच कागदपत्र घेण्यात यावी, असे निर्देश आहेत. मूल्यांकन, चतु:सीमा यासारखे कागदपत्र मागू नयेत, असे सांगितले. शेतकºयांना सुलभ कर्ज वाटप करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सहायक निबंधक यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे, अशा सूचना तिवारी यांनी दिल्या. कर्जमाफीची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसन्याबाबत आ. कुणावार यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली. कर्जमाफीची रक्कम अद्याम जमा न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम ३० जूनपर्यंत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. तूर आणि हरभरा खरेदीबाबत शासनाकडे बैठक लावावी. शेतकऱ्यांकडे अजूनही तूर व हरभरा पडून असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँक शाखेत तथा ग्रा.पं. मध्ये लावावी, असे ते म्हणाले.
बोंडअळीचे पैसे हे योजनेचे पैसे आहेत, ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळते करू नये. कर्ज खात्यात वळते केल्याचे आढळल्यास सरकारी निधीचा गैरवापर प्रकरणी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नवाल यांनी दिला. ठिबक सिंचन संचाचा बॅकलॉग यंदा पूर्ण केला. यासाठी ११.५० कोटी रुपये दिले असून यांत्रिकीकरणासाठी निधी दिल्याचे नवाल यांनी सांगितले.
बैठकीला पं.स. सभापती, लीड बँक मॅनेजर वामन कोहाड, सहा. निबंधक तलमले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Distribute crop loan to farmers within 30 June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.