नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 06:19 PM2020-04-21T18:19:50+5:302020-04-21T18:20:26+5:30

कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.

Distribution of essential commodities in Wardha district by Nana Patekar's Nam Foundation | नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Next
ठळक मुद्दे१३० परिवारंना दिली जीवनावश्यक वस्तूंची कीट



लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: एकेकाळी लाख मोलाची जमीन बाळगुन असणाऱ्या मिझार्पुर (नेरी) हे गाव निम्न वर्धा प्रकल्पामुळे कफल्क झाले. अशातच कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश वि•ाागाचे समन्वयक हरिभाऊ ईथापे, समाजसेवक संजय तिगावकर, उपविभागीय अधिकारी हरीष धार्मीक, ठाणेदार संपत चव्हाण, अ.भा. अनिसचे वर्धा जिल्हा सदस्य दशरथ जाधव, डॉ. रवींद्र सोनटक्के, उपसरपंच बाळा सोनटक्के, प्रा. नरेंद्र कोल्हे, ग्रामसेवक राजु शेंद्रे, पांडुरंग कोल्हे, अशोक भट्टड, विरेंद्र कोल्हे, दादाराव नासरे, बाबाराव नासरे यांच्या हस्ते सर्व नियमाचे पालन करुन या किटचे ग्रामस्थानच्या घरोघरी जावून वाटप करण्यात आले.
बाकळी व वर्धा नदीच्या संगमामुळे वैभव संपन्न असलेल्या मिझापुर (नेरी) गावातील लाखोमोलाची जमीन गावकऱ्यांनी निम्न वर्धा धरणाकरीता कवडीमोलाने दिली. शासनाकडून मिळालेल्या अल्प मोबदल्यात पयार्यी जमीन घेता आली नाही. परिणामी १५० वैभवसंपन्न परिवारावर •ाुमीहीन व कफल्क होण्याची पाळी आली. अनेकांच्या हाताला काम देणाऱ्यांवरच उदर•ार्नाकरीता काम शोधण्याची पाळी आली. काहींना येथील प्लायवूड कारखाण्याची साथ मिळाली, काहींनी पेट्रोल पंम्प वर पेट्रोल भरण्याचे काम नाईलाजास्तव स्वीकारले तर अनेकांनी हातमजुरीवर जाणे सुरू केले. नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी दखल घेवून दुसऱ्याच दिवशी १३० गरवंतांकरीता जिवनावश्यक वस्तुंच्या किट. वाटपा करीता उपलब्ध करून दिल्या.

बांधलेली घरे व गावातील स्वच्छता पाहता डोळ्यांना समृध्द दिसणाऱ्या गावातील नागरीकांच्या अंतर्गत अडचणीवर लक्ष केंद्रीत करून नाम फाऊंडेशनचे समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या सोबत संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. याकरीता गावकऱ्यांच्यावतीने उपसरपंच बाळा सोनटक्के यांनी नाम फाऊंडेंशनचे आभार मानले.

मदतीचा हात सदैव पुढेच राहणार
नाम ने गरजवंत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला व याची सुरू आर्वी लगतच्या मिझार्पुर (नेरी) पासुन केली. यानंतर मेळघाट, चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती आदि ठिकाणी सुध्दा जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात नाम फाऊंडेशनच्या मदतीचा हात सदैव पुढेच राहणार आहे असे विदभा व खानदेश समन्वयक हरिष ईथापे यांनी सांगितले.

Web Title: Distribution of essential commodities in Wardha district by Nana Patekar's Nam Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.