अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा १५ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:40 PM2018-04-27T23:40:50+5:302018-04-27T23:40:50+5:30
पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी पशुपालकांना यथायोग्य मार्गदर्शन करतात. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदललेला आहे. सन २०१६-१७ च्या तांत्रिक कामामध्ये वर्धा जिल्हा राज्यात ३६ व्या क्रमांकावर होता; ....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी पशुपालकांना यथायोग्य मार्गदर्शन करतात. यामुळे पशुसंवर्धन विभागाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदललेला आहे. सन २०१६-१७ च्या तांत्रिक कामामध्ये वर्धा जिल्हा राज्यात ३६ व्या क्रमांकावर होता; पण आता तो सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नामुळे १५ व्या स्थानी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने यांनी केले.
पशुसंवर्धन विभाग वर्धा आणि व्हिर बँक अॅनिमल हेल्थ इंडिया प्रा. लि.यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वर्धा कार्यालयात जागतिक पशुवैद्यक दिनाचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय अवघाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा गुल्हाणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान डॉ. संजय अवघाते यांनी जनावरांवरील विविध रोग व त्यांचे निदान तसेच औषधोपचार बाबत माहिती दिली. तर डॉ. प्रज्ञा गुल्हाणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ. विजय भिरंगी, डॉ. मोहन खंडारे, डॉ. बागल, डॉ. खोपडे, डॉ. ब्राह्मणकर, डॉ. दिवाळे, डॉ. गायकवाड, डॉ. वनकर, डॉ. भिसेकर, डॉ. सोनोने, डॉ. काळे, डॉ. डिडोळकर यांची उपस्थिती होती. संचालन डॉ. बि. व्ही. वंजारी यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण तिखे, डॉ. वानखेडे, हाडके, बुधे, इंगळे, येमुलवार आदींनी सहकार्य केले.