पालिकेच्या ‘त्या’ ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी
By admin | Published: April 18, 2015 01:59 AM2015-04-18T01:59:09+5:302015-04-18T01:59:09+5:30
येथील पालिकेच्या कामांना स्थगिती देण्याबाबात माजी उपाध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
सिंदी (रेल्वे) : येथील पालिकेच्या कामांना स्थगिती देण्याबाबात माजी उपाध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निर्णय देत ती खारीज करण्यात आली. यामुळे सिंदी (रेल्वे) येथील त्या ठरावाला हिरवी झेंडी मिळाली आहे.
सिंदी नगर पालिकेत अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यानंतर सत्तापालट होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. यावेळी विरोधी पक्षात असलेले माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर व राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी व इतर १२ जणांविरूद्ध ही तक्रार २७ जानेवारी १५ रोजी महाराष्ट्र राज्य अधिनियम १९६५ च्या ३०८ कलम अन्वये केली होती. यात पालिकेच्या ठरावातील कामांना त्वरीत स्थगिती देण्याबाबत मागणी केली होती. शिवाय मंजूर झालेली कामे सत्ताधाऱ्यांच्या प्रभागातील असून यात शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन्ही तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी चोहोबाजुंची चौकशी करून सदर तक्रार खारीज केली. (प्रतिनिधी)