शेतकरी संघटनेचा जिल्हाकचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:48 AM2017-08-02T00:48:53+5:302017-08-02T00:49:28+5:30
राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी,
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटेनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्यांनी कर्जमाफीच्या विरोधात नारेबाजी करीत वरिष्ठांपर्यंत मागण्या पोहोचविण्यांकरिता जिल्हाधिकाºयांना साकडे घातले.
राज्य सरकारला आपल्या सकल राज्य उत्पन्नाच्या २४ टक्के कर्ज उभे करण्याची मुभा असते. महाराष्ट्र राज्यावरील कर्जाच्या बोज्याची मर्यादा सध्या १६.५ टक्केवर पोहोचलेली आहे. तेव्हा कर्जमुक्तीसाठी निधी उभा करण्यास राज्य सरकारला बºयापैकी वाव असल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकºयांचा सातबारा कोरा करावा. कर्जबाजारीपणा व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतमालाला योग्य भाव दिल्या जात नाही. शेतकºयाच्या हितासाठी असलेला स्वामिनाथन आयोग लागू करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातून निघालेल्या मोर्चाने दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. मोर्चाचे नेतृत्त्व माजी आमदार सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाधिकाºयांना निवदेन देवून मोर्चाचा समारोप करण्यात आला.
आंदोलनात गंगाधर मुटे, संध्या राऊत, सचिन डाफे, शैलजा देशपांडे, मधुसुदन हरणे, सतीश दाणी, गजानन निकम, पांडुरंग भालशंकर, निळकंठ घवघवे, सुभाष बोकडे, नंदु काळे, प्रभाकर झाडे, धोंडबा गावंडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अन्यथा उपोषण
मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना मंगळवारी सादर करण्यात आले. निवेदनात नमुद असलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने येत्या काही दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास ३ सप्टेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध
हुतात्मा स्मारक परिसरात एकत्र झालेल्या शेतकरी व आंदोलनकर्त्यांना मोर्चा पूर्वी माजी आमदार सरोज काशीकर, गंगाधर मुटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर ताशेरे ओढले. तसेच कुठलीही अट न लावता राज्यातील सर्वच शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली.