‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा ‘कायापालट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 06:00 AM2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:00:22+5:30
शासनाच्या महत्त्वाकांशी असलेल्या ‘कायाकल्प’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा येथील अधिकाऱ्यांनी उचलला आहे. ‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णालयात तब्बल ४.७४ लाखांच्यावर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा सध्या चेहरा बदलल्याचे बघावयास मिळत आहे. तेथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून ‘स्वच्छ रुग्णालय... उत्तम रुग्णालय’ हे ब्रिद वाक्य प्रत्यक्ष कृतीत उतरवून बापूंना आदरांजली अर्पण केली जात आहे.
शासनाच्या महत्त्वाकांशी असलेल्या ‘कायाकल्प’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा येथील अधिकाºयांनी उचलला आहे. ‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णालयात तब्बल ४.७४ लाखांच्यावर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. प्रत्येक गरजूंसह रुग्णाला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्यासह त्यांचे विश्वास संपादीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न असल्याने रुग्णांनाही दिलासा मिळत आहे.
पाच वर्षांत १,०५५ गंभीर शस्त्रक्रिया
जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील पाच वर्षांत अनेक किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्या असून याच कालावधीत तब्बल १ हजार ५५ गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रीया करण्यात तेथील वैद्यकीय अधिकाºयांना यश आले आहे.
६,०५८ गर्भवती महिलांना दिला उपचार
कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा या दृष्टीने आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसुती विभागाकडून १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत तब्बल ६ हजार ५७ गर्भवती महिलांना चांगली आरोग्य सेवा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून एका गर्भवती महिलेची प्रसुती केली. त्या महिलेने तिळ्यांना जन्म दिला
तीनवेळा पटकाविला तृतीय पुरस्कार
शासनाच्या महत्त्वाकांशी उपक्रम असलेल्या ‘कायकल्प’ स्पर्धेत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाने यापूर्वी तीन वेळा तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. शिवाय पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम रुग्णालय प्रशासनाने रुग्णसेवेसाठी खर्च केल्याचे सांगण्यात आले.
प्रथम पुरस्कारासाठी धडपड
कायाकल्प या स्पर्धेत मागील तीन वर्ष सतत तृतीय पुरस्कार पटकाविणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयाने यंदा प्रथम पुरस्कार खेचूनच आणू अशी तयारी केली आहे. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला ५० लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाल्यास पुरस्काराच्या रक्कमेतून आणखी चांगली आरोग्य सेवा देण्याचा मानस तेथील अधिकाºयांचा असल्याचे सांगण्यात येते.
शुक्रवारी येणार अधिकाऱ्यांची चमू
कायाकल्प या उपक्रमाच्या स्पर्धेत उडी घेतलेल्या वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवांची पाहणी करण्यासाठी शुक्रवार ७ फेब्रुवारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू येत आहे. या चमूतील अधिकारी काही रुग्णांशीही संवाद साधणार असून त्यानंतर ते आपला अभिप्राय वरिष्ठांना सादर करणार आहेत.
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाने यापूर्वी तीन वेळा कायाकल्पचा तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. स्वच्छ रुग्णालय आणि चांगली आरोग्य सेवा देत प्रत्यक्ष कृतीतून आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे.
- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.