जिल्ह्यात अपघातांनी काळवंडली धुळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:15 PM2018-03-03T23:15:57+5:302018-03-03T23:15:57+5:30

होळीच्या पर्वावर जिल्ह्यात येणारी दारू रोखण्याकरिता पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली; पण धुळवडीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दारूचे पाट दिसून आले.

In the district, the Kalvandli Dholavad was constructed by accident | जिल्ह्यात अपघातांनी काळवंडली धुळवड

जिल्ह्यात अपघातांनी काळवंडली धुळवड

Next
ठळक मुद्देसहा अपघातात तीन ठार : सेवाग्राम, कारला येथे घटना

ऑनलाईन लोकमत
वर्धा : होळीच्या पर्वावर जिल्ह्यात येणारी दारू रोखण्याकरिता पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली; पण धुळवडीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दारूचे पाट दिसून आले. यातच झालेल्या अपघातांत तिघांचा बळी गेला. हे अपघात सेवाग्राम व कारला रोड परिसरात घडले. तिसरा अपघात वायगाव (निपाणी) येथे झाला असून यात एक जण जखमी झाला.
अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई माधव फड आणि गृहरक्षक दलाचा शिपाई रवी चंदनखेडे दोन्ही रा. एकुर्ली यांची शुक्रवारी सेवाग्राम रुग्णालयात आरोपीजवळ कर्तव्य बजावत होते. दरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास दोघेही चहा पिण्याकरिता दुचाकी क्र. एमएच २२ एएम ७१४४ ने सेवाग्राम रुग्णालयाच्या बाहेर जात होते. मागील काही दिवसांपासून पोलिसांनी जप्त केलेला ट्रक क्र. एमएच ३४ एबी ०७२० हा रस्त्याच्या कडेला उभा आहे. काळोखामुळे सदर ट्रक माधवला दिसला नाही आणि भरधाव दुचाकीची मागाहून ट्रकला धडक बसली. या भिषण अपघातात माधव फड व रवी चंदनखेडे यांचा जागीच मृत्यू झाला. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत अपघाताची नोंद घेतली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. पूढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे एकुर्ली गावात हळहळ व्यक्त होत असून अल्लीपूर पोलीस ठाण्यातही शोक व्याप्त आहे.
व्हीडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण
अल्लीपूर पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या माधव फड याने मृत्यूपूर्वी रात्री एक व्हीडीओ तयार केला. त्यात मी आत्महत्या करीत असून माझा कुणावरही आक्षेप नाही, असे त्याने नमूद केले आहे. सदर व्हीडीओ त्याने स्वत: काढून तो व्हायरल देखील केला. हा व्हीडीओ व्हायरल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. सदर अपघात त्याने मुद्दामहून तर घडवून आणलेला नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
ट्रॅक्टरच्या धडकेत एक जखमी
वायगाव (नि) - नेरी येथील अविनाश सुधाकर सराटे (२४) हे शनिवारी सकाळी ९.३० वाजता दुचाकी क्र. एमएच ३२ एक्स २८१७ ने वायगाव (नि) येथे येत होते. दरम्यान, समोरून येणाºया भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात अविनाश सराटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सावंगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या अपघाताची वायगाव (नि.) पोलीस चौकीने नोंद घेतली असून तपास चौकी इंचार्ज गजानन दराडे करीत आहेत.
कारच्या धडकेत युवक ठार
वर्धा - भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी कारला चौक परिसरात घडला. तुषार प्रमोद जिंदे (१९), असे मृतकाचे नाव आहे. तो दुचाकी क्र. एमएच ३२ आर २५६५ ने जात होता. कारला चौक परिसरात त्याच्या दुचाकीला एमएच ३२ डीसी ९९२० क्रमांकाच्या कारने समोरून धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तुषारला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तपासणीअंती वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.
दोन दुचाकी धडकल्या दोघे गंभीर जखमी
गिरड - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी गिरड परिसरातील पेट्रोल पंपासमोर घडला. एमएच ३२ एस ८३२३ क्रमांकाची दुचाकी गिरड येथून समुद्रपूरकडे जात होती. दरम्यान, समुद्रपूरकडून गिरडकडे येणाºया एमएच ४० सी ९५७५ क्रमांकाच्या दुचाकीने समोरून येणाºया दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झालेत. गिरड पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून वृत्त लिहीस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दुचाकीच्या धडकेत महिला जखमी
वर्धा - भरधाव दुचाकीने पायी जाणाऱ्या महिलेला जबर धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी रात्री भूगाव परिसरात घडला. बासंती रत्नाकर साहू (५५), असे जखमी महिलेचे नाव आहे. रत्नाकर व बासंती हे दोघेही पायी फिरत होते. दरम्यान, मागाहून आलेल्या भरधाव दुचाकीने बासंती यांना जबर धडक दिली. सावंगी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
पादचारी महिलेला दुचाकीची धडक
पुलगाव - प्रात:विधी आटोपून पायी घराकडे जात असलेल्या महिलेला दुचाकी क्र. एमएच ३२ झेड १९५७ ने जबर धडक दिली. या अपघातात प्रमिला श्रावण तलवारे रा. रामपूर ही महिला जखमी झाली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. पुलगाव पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: In the district, the Kalvandli Dholavad was constructed by accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात