केंद्र सरकारच्या योजना अंमलबजावणीत जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:56 AM2017-11-24T00:56:33+5:302017-11-24T00:56:44+5:30
केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात लोकप्रनिधिनीसह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही मोठा पुढाकार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक व न्याय अधिकार मंत्रालयाच्या एडीफ योजनेअंतर्गत दिव्यागांना वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच ३ हजार ५४२ विविध उपकरणे २ हजार १२१ दिव्यागांना वितरीत करण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने १ ते ९ जुलै व ३ ते ५ आॅगस्ट या कालावधीत तालुका स्तरावर दिव्यांगांचे शिबिर आयोजित करून त्यातून त्यांना कोणत्या वस्तूंची गरज आहे, याची माहिती जाणली व त्यानंतर दिव्यागांसाठी ते उपकरण उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनेतून दिव्यांगांना चांगला दिलासा मिळाला आहे. अशीच परिस्थिती उज्ज्वला योजनेचीही आहे. जिल्ह्यात २८ हजार ९६० कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ३६ हजार ६९१ कुटूंबांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २८ हजार ९६० कुटूंबांना लाभ देण्यात आला. १६०० रूपयात गॅस शेगडी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे तेवढे कुटूंब आता चुलमूक्त झाले आहे. वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवळी तालुक्यातील पिंपळगाव (लुटे) च्या लाभार्थ्याला पत्र पाठवून त्याचे कौतुक केले. एकूणच केंद्र सरकारच्या योजनेच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्ह्याची आघाडी सरस ठरली आहे.
जिल्हाधिकारी व यंत्रणांचा पुढाकार महत्त्वाचा
वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सोबत घेवून विविध योजनांच्या अंमलबजावणीत पुढाकार घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनीही आरोग्य शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे दिव्यांगांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून देण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या योजना राबविल्या जात आहे. त्यातील बºयाच योजनांच्या अंमलबजावणीवर थेट पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी केंद्र सरकारचे विविध मंत्रालय व थेट जिल्हा प्रशासन यांच्यात चांगला समन्वय आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनही आम्ही या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करीत आहो. त्यामुळे अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येत आहे.
- रामदास तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र.