जिल्हाधिकाऱ्यांची भेट नगर प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:26 PM2018-10-11T22:26:41+5:302018-10-11T22:27:03+5:30
डेंग्यू सदृश्य आजाराचे वाढते प्रमाण व शहरातील स्वच्छता मोहीम याकडे नगर प्रशासनासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कर्तव्य म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ नगर प्रशासनाचीच ही जबाबदारी नव्हे, शहरातील अनेक भागात नगर प्रशासनाने भूमीगत नाल्या बांधून गल्ली बोळात स्वच्छतेच्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : डेंग्यू सदृश्य आजाराचे वाढते प्रमाण व शहरातील स्वच्छता मोहीम याकडे नगर प्रशासनासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कर्तव्य म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ नगर प्रशासनाचीच ही जबाबदारी नव्हे, शहरातील अनेक भागात नगर प्रशासनाने भूमीगत नाल्या बांधून गल्ली बोळात स्वच्छतेच्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नागरिकांनी आपल्या कर्तव्याचा व जबाबदारीचा विसर पडत असल्याचे चित्र काही गल्ली बोळातून दिसून आले. स्वच्छता अभियान हे केवळ अभियान न राहता लोकचळवळ व्हावी, असा मौलीक सल्ला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहरात दिलेल्या अचानक भेटी दरम्यान दिला.
शहरातील डेंग्यू सदृश्य आजाराचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत ५ बालक या रोगाचे बळी पडले आहेत. ज्या ज्या भागात या घटना घडल्या त्या त्या भागात गुरूवारी सकाळीच जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले व अनेक अधिकारी शहरात अचानक दाखल झाल्यामुळे स्थानिक नगर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. जिल्हाधिकारी, अधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांचा आलेला ताफा पाहून शहरवासियांनी अनेक समस्यांचा पाढा त्यांचे समोर मांडला.
जिल्हाधिकाºयांनी नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाची काही ठिकाणी प्रशंसा केली तर काही ठिकाणी तीव्र नाराजी नोंदविली. नागरिकांनी नगर परिषदेच्या घंटागाड्या नियमीतपणे येत नाही. गल्लीबोळातील वाढते अतिक्रमण या बाबत नगर परिषदेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रारी केल्या असता पत्रकारांशी बोलताना व मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना सूचना देताना ते म्हणाले ‘स्वच्छता अभियान राबविताना संत गाडगेबाबा व राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कार्य करा, सार्वजनिक आरोग्य व लोकहीत महत्वाचे आहे. त्यात ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे की नगर परिषदेचे हा विचार न करता सार्वजनिक आरोग्याला महत्व द्या, लोकहिताच्या कार्यात गल्लीबोळातील अतिक्रमण आड येत असेल तर महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कायद्याचा वापर करा, अशा सूचनाही त्यांनी नगर प्रशासनाला दिल्या.
शहरातील काही गल्लीबोळातील नाल्या मोठा नाला, स्वच्छता पाहत त्यांनी नगर परिषद व ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचे सोबत डॉ. सचिन पावडे, कारंजा नगर पंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत, देवळी न.प. मुख्याधिकारी जाधव, वर्धा तहसीलदार बांबोर्डे, नायब तहसीलदार वरपे, नायब तहसीलदार उल्हास राठोड, नगराध्यक्षा शितल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, संजय गाते, नितीन बडगे, कॉँग्रेस शहराध्यक्ष रमेश सावरकर, शिवसेनेचे बाळू शहागडकर, अॅड. माथने, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, नागरिक सेवा समितीचे गिरीष चौधरी, डॉ. प्रमोद नितनवरे, नगरसेवक गौरव दांडेकर, माधुरी इंगळे, काळे यांचेसह नगरसेवक मोठ्या संख्येत नागरिकही सहभागी होते. याप्रसंगी ग्राम पंचायत नाचणगावातही तक्रारी करण्यात आल्या.
गल्लीतही पोहचले ेजिल्हाधिकारी
सकाळी शहरातील इंदिरा नगर, सुदर्शन नगर, गांधीनगर, हरिरामनगर आदीसह काही भागात जिल्हाधिकारी व इतर अधिकाºयांनी स्वच्छता अभियान डेंग्यू सदृश्य आजाराबाबत आरोग्य यंत्रणा स्वच्छता अभियान याबाबत पाहणी केली. पत्रकारांनी प्रश्नाचा केलेला भडीमार नागरिकांनी केलेल्या तक्रारी याबाबत शांतपणे जिल्हाधिकाºयांनी सर्वांशी सुसंवाद साधता नगर प्रशासनाला व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ नारलवार यांनाही सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता अभियानाबाबत सूचना दिल्या.