जि.प.अध्यक्षांनी घेतली अल्लीपूरची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:20 AM2018-04-22T00:20:42+5:302018-04-22T00:20:42+5:30
गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी गावत जाऊन गावातील नागरिकांच्या संमस्या ऐकून घेतल्या.
यावेळी त्या समस्या कशा प्रकरणे निकाली काढता येतील या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांसमक्ष झालेल्या या चर्चेला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा शेनवार, उपकार्यकारी अभियंता बेंद्रे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एम.जी.पी) उपकार्यकारी अभियंता देवगडे उपस्थित होते. यावेळी चर्चा करून गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्या तात्कालीन निकाली काढून गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याच्या सूचना केल्या. सोबतच गावातील सिमेंट रस्त्याचे कामे अर्धवट पूर्ण झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. या संदर्भात कार्यकारी अभियंता बांधकाम तेलंग व उपकार्यकारी अभियंता झाडे यांना मोका चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी पं.स.सभापती गंगाधर कोल्हे, पं.स.सदस्य प्रशांत चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, सचिव अशोक गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्यांसह येथील गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.