जिल्ह्यात ७.४० लाख वृक्ष लागणार

By admin | Published: July 1, 2016 02:04 AM2016-07-01T02:04:51+5:302016-07-01T02:04:51+5:30

राज्यात २ कोटी वृक्षलावगड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शुक्रवारी ७ लाख ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

The district will have 7.40 lakh trees | जिल्ह्यात ७.४० लाख वृक्ष लागणार

जिल्ह्यात ७.४० लाख वृक्ष लागणार

Next

वृक्ष लागवड कार्यक्रम : वनविभाग लावणार ५ लाख वृक्ष
वर्धा : राज्यात २ कोटी वृक्षलावगड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शुक्रवारी ७ लाख ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उद्देश यशस्वी करण्याकरिता एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना शासनाकडून राबविण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
वृक्षारोपण मोहिमेत वनविभाग, सामाजिक वनीकरण, महसूल व इतर सर्व विभाग प्रमुख, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, निसर्ग सेवा समिती आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून मोहीम यशस्वी करण्यात येणार असून एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी जनतेने यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षरोपणासाठी वृक्ष उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी सांगितले.
शुक्रवारी वृक्ष लागवड करण्याबाबतचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत वन विभागास जंगलक्षेत्रातील ५८ रोपवनस्थळी एकूण ४ लाख ९९ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाला २० हजार व शासनाच्या इतर २० विभागांतर्गत असलेल्या यंत्रणांना २ लाख २० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडे इतर विभाग व यंत्रणासाठी वर्धा परिक्षेत्र गांधी रोपवाटिका, वर्धा, हिंंगणी वनपरिक्षेत्र हिंगणी रोपवाटिका, समुद्रपूर वनपरिक्षेत्र मोहगाव रोपवाटिका, आष्टी वनपरिक्षेत्र पिलापूर रोपवाटिका, तळेगाव वनपरिक्षेत्र जसापूर, रोपवाटिका व कारंजा परिक्षेत्र, खरांगणा रोपवाटीकेत रोप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या रोप वाटिकेत करंज, पेल्टोफोरम, गुलमोहर, शिशु, कॅशिया, आवळा, सिताफळ, महारूखा, पापडा, बेहडा, खैर, अंजन, अमलतास, साग, कडूनिंब इत्यादी जातीचे रोपे उपलब्ध आहे.
वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच इतर सर्व यंत्रणेचे अधिकारी यांनी नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुक्याकरिता एक तालुका समन्वयक लागवड अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून सामाजिक वनिकरणचे उपसंचालक आहे. तालुका समन्वयक लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी आणि कारंजा आहेत.
वृक्ष लागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभाग व्हावा या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रोपे लागवड कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी, संस्थाचे पदाधिकारी, शाळेचे विद्यार्थी, सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था व वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक इच्छुक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या मोहिमेत कुठलीही अडचण आल्यास उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू पगार व उपसंचालक, सामाजिक वनीकरण एस.टी. साळगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपवनसंरक्षक दिगांबर पगार यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते होणार वृक्ष लागवड
- राज्यात २ कोटी वृक्ष लागवड केली जाणार असून जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड केली जाणार आहे.
-देवळी तालुक्यातील गुंजखेडा येथे खासदार रामदास तडस, हिंगणघाट तालुक्यातील धर्मापूर व समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे आमदार समीर कुणावार, सेलू तालुक्यातील रायपूर येथे आमदार डॉ. पंकज भोयर, वर्धा तालुक्यातील आंजी जवळील पवनूर, भूगाव व तरोडा येथे आमदार रणजीत कांबळे, आर्वी तालुक्यातील सारंगपुरी व बायोडयाव्ह सिटी पार्क तळेगाव येथे आमदार अमर काळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड केली जाणार आहे.
-जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुद्धा १ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात त्यांच्याच निवासस्थानापासून करणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

वृक्ष लागवडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामात सूट
राज्यातील २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामावर येण्यासाठी दुपारी १ वाजता पर्यंत सूट देण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी जेथे वृक्ष लागवड केली त्या ठिकाणचे वृक्ष लागवड करून सहभाग घेतल्याचे छायाचित्र कार्यालयाला सादर करावे लागेल. ही सूट केवळ वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाकरिताच असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

Web Title: The district will have 7.40 lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.