जिल्ह्यात चार ठिकाणी होणार दिव्यांग उपकरण वितरण
By admin | Published: January 10, 2017 12:38 AM2017-01-10T00:38:26+5:302017-01-10T00:38:26+5:30
वर्धेतील दिव्यांगाकरिता उपकरण वितरण विशेष शिबिराचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री
रामदास तडस यांना न्याय राज्यमंत्र्यांचे पत्र
वर्धा : वर्धेतील दिव्यांगाकरिता उपकरण वितरण विशेष शिबिराचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले होते. याला अनुसरून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्यातर्फे लवकरच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी विधानसभा मतदार संघात सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर दिव्यांगाकरिता भारत सरकारच्या माध्यमातून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे.
खा. तडस यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पत्र प्राप्त झाले असून भारत सरकारच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात येणार आहे.
वर्धा येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद्र गहलोत यांच्या हस्ते ५७१ दिव्यांग व्यक्तींना सहायक उपकरण वितरीत केले होते. त्याच धरतीवर वर्धेतील चार विधानसभा क्षेत्रात हे शिबिर आहे. दिव्यांगांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.