बनावट कागदपत्रांद्वारे दिव्यांगाचे घर हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:20 PM2019-04-21T22:20:29+5:302019-04-21T22:20:57+5:30

बोरगाव (टुमणी) येथील रहिवासी असलेल्या वृद्ध व दिव्यांग असलेल्या महादेव झारे यांच्या घरावर दुसऱ्या नागरिकाने बनावट कागदपत्र करून ताबा मिळविला आहे. विशेष म्हणजे याची ग्रामपंचायत रितसर नोंद घेत कर पावतीही तयार करण्यात आली आहे.

Divya's house was captured by fake documents | बनावट कागदपत्रांद्वारे दिव्यांगाचे घर हडपले

बनावट कागदपत्रांद्वारे दिव्यांगाचे घर हडपले

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामसेवकाने घेतली नोंद : प्रकरण उघडकीस येताच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : बोरगाव (टुमणी) येथील रहिवासी असलेल्या वृद्ध व दिव्यांग असलेल्या महादेव झारे यांच्या घरावर दुसऱ्या नागरिकाने बनावट कागदपत्र करून ताबा मिळविला आहे. विशेष म्हणजे याची ग्रामपंचायत रितसर नोंद घेत कर पावतीही तयार करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार उघडकीस येताच एकच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रताप करणारा ग्रामसेवकावर यापूर्वी निलंबनाची कारवाई झाले आहे, हे उल्लेखनिय.
प्राप्त माहितीनुसार, ७० वर्षीय महादेव झारे यांना जन्मताच पोलीओने ग्रासले आहे. त्यांना व्यवस्थित चालताही येत नाही. अलीकडे त्यांची दृष्टी गेली. घरीकुणीच नसल्याने त्यांनी नात्यातीलच प्रमोद झारे याला जेवणासाठी डबा आणण्याचे सांगितले. याच संधीचा फायदा घेऊन प्रमोद याने ग्रा.पं.त काहींना हाताशी धरून ग्रामसेवकाच्या मार्फत घर नावाने करण्याचा प्रताप केला. कुठल्याही प्रकारची खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नाही. मात्र घर प्रमोद झारे यांच्या नावावर करण्यात आले. वृद्धाचे पुतणे अनिल झारे रा. सुरत हे गावात आले. त्यांनी मालमत्ता कर अदा करण्यासाठी ग्रा.पं. कार्यालय गाठले असता डिसेंबर २०१८ मध्ये महादेव झारे यांचे घर थेट प्रमोद झारे यांच्या नावाने झाल्याची माहिती त्यांना मिळाली. शिवाय कराचा भरणा प्रमोद झारे यांनी केला. अनिल याने या घटनेची माहिती काका महादेव यांना दिल्यावर त्यांनाही धक्काच बसला. घटनेची माहिती संजय ठाकरे यांना मिळताच त्यांनी वृद्धाला सोबत घेऊन पोलिसात तक्रार दिली; पण कारवाई झाली नाही.
ग्रामसेवकावर यापूर्वीही निलंबनाची कारवाई
बोरगाव (टुमणी) ग्रा.पं. या-ना त्या विषयाने नागरिकांसाठी चर्चेचा विषयच ठरली आहे. येथे रेकॉर्डमध्ये हेरफेर केल्या प्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यातच हा प्रकार उजेडात असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.

बोरगाव येथील बेकायदेशीय प्रकरणाची तहसील व रजिस्टार कार्यालयात चौकशी केली असता महादेव झारे यांच्या नावाचे कुठेही मुद्रांक नाही. बनावट कागदपत्राच्या आधारे आणि पदाचा गैरवापर करून ग्रा.पं.पदाधिकारी व ग्रामसेवकाने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी.
- संजय ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता, बोरगांव (टुमणी).

Web Title: Divya's house was captured by fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.