महिलांनो संस्कृतीशी नातं तोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:45 PM2018-03-11T22:45:08+5:302018-03-11T22:45:08+5:30
समाजाने आपला आदर करावा असे वाटत असेल तर संस्कृतीशी नातं तोडू नका. कारण आपल्या संस्कृतीत स्त्रिया या पूर्ण कपड्यात सुंदर दिसतात असे म्हटले आहे.
ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : समाजाने आपला आदर करावा असे वाटत असेल तर संस्कृतीशी नातं तोडू नका. कारण आपल्या संस्कृतीत स्त्रिया या पूर्ण कपड्यात सुंदर दिसतात असे म्हटले आहे. त्यामुळे ही नाळ जोडून ठेवा, असे मत प्रसिद्ध समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले. येथील रा.सु. बिडकर महाविद्यालयात आयोजित महिला दिन सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
वर्धा जिल्हा आशीर्वाद महिला नागरी बँक व ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक जबाबदारी सांभाळीत समाजात उल्लेखनीय कार्य करणाºया महिलांचा गौरव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी डॉ.प्रा. उषा थुटे तर विशेष अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, हिंगणघाट, प्रसिद्ध लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर, भाजप जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे, नगरपरिषद सदस्य अनिता माळवे, छाया सातपुते, उत्कृष्ट महिला शेतकरी नीता सावदे, जानराव राऊत, प्रा बी.जी. आंबटकर, समुद्रपुर नगरपंचायत अध्यक्ष शीला सोनारे, श्रद्धा कुणावार, रंजना थुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेच्यावतीने सिंधुताईंचा सत्कार उषा थुटे यांनी केला. सत्काराला उत्तर देताना सिंधुताई यांनी अनेक दाखले देत महिलांनी सक्षम होण्यासाठी घराबाहेर पडले पाहिजे. घरी आपली कोणीतरी वाट पाहते याचे भानही ठेवले पाहिजे. आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कविता घोडे, मयुरी देशमुख, राजश्री विरुळकर, प्रतिभा भानखेडे, अल्का भूगुल, संगीता इंगळे, पद्मरेखा धनकर, नीता सावदे, श्रेया केने, स्नेहल कुबडे, माया चाफले, वेदांती घाटे, अर्चना देव, शीला सोनारे, राजश्री झोटिंग, ज्योती हेमने, प्रांजली डाखोरे, श्रद्धा कुणावार, शुभांगी डांगे यांचा सत्कार केला.
अध्यक्षीय भाषणातून थुटे यांनी महिलांच्या उन्नतीसाठी दोन्ही संस्था सतत कार्य करीत राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन लीना शेंडे, मानपत्र वाचन प्रांजली डाखोरे, प्रास्ताविक मनीषा रिठे यांनी केले. स्वागतगीत विजय गावंडे यांनी सादर केले. आभार माधुरी विहिरकर यांनी मानले. कार्यक्रमाला शीतल ठाकरे, सपना अवचट, इशा ढोबळे, कल्पना ढोले, सविता आंबटकर, जयश्री तडस, सुरेश डंबारे, शरद विहिरकर, राजू निखाडे, शेखर कुटे, छत्रपती भोयर, ज्ञानेश्वर चौधरी, आशिष भोयर, अभिजित डाखोरे, सतीश चौधरी यांनी सहकार्य केले. सखी मंच ग्रुप आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.