संसारोपयोगी साहित्य आणत नाही म्हणून झाले कडाक्याचे भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:41 PM2018-08-25T23:41:51+5:302018-08-25T23:42:30+5:30

नजीकच्या एकुर्ली येथील कल्पना कैलास उर्फ भोला खोंड (३५) हिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी पती कैलास खोंड याला पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून अवघ्या काही तासात अटक केली आहे.

Do not bring the worldly literature as a rude quarrel | संसारोपयोगी साहित्य आणत नाही म्हणून झाले कडाक्याचे भांडण

संसारोपयोगी साहित्य आणत नाही म्हणून झाले कडाक्याचे भांडण

googlenewsNext
ठळक मुद्देकल्पना खोंड खूनप्रकरण : मोबाईल लोकेशनवरून आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : नजीकच्या एकुर्ली येथील कल्पना कैलास उर्फ भोला खोंड (३५) हिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी पती कैलास खोंड याला पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून अवघ्या काही तासात अटक केली आहे. कैलास हा घरात संसारउपयोगी साहित्य आणत नसल्याने मृतक व आरोपी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याचवेळी कैलास याने कल्पनाचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
कल्पना व कैलास यांच्यात त्यांच्या राहत्या घरी भांडण झाले. हा त्यांचा घरगुती वाद असल्याने ग्रामस्थांनीही सुरूवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान आरोपीने कल्पनाचा गळा आवळून तिची हत्या करीत घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. गावात खून झाल्याचे लक्षात येताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शिवाय खात्रिदायक माहितीच्या आधारे कैलासवर आरोपी असल्याचा ठपका ठेवून त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.
घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणेदार प्रवीण डांगे यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठविला. याच दरम्यान कैलासच्या मोबाईलचे लोकेशन संबंधित अधिकाऱ्यांकडून ट्रेस करीत त्यांनी संजय रिठे, बाळा तिवारी, महेंद्र गायकवाड, अभय खोब्रागडे यांना नाकाबंदी करण्यास सूचविण्यात आले. शिवाय हिंगणघाट आणि वडनेर पोलिसांनाही माहिती देण्याचे सांगण्यात आले. मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाअंती पोलिसांनी आरोपी कैलास खोंड याला वर्धा -हिंगणघाट मार्गावरील इंझाळा शिवारातून मध्यरात्री ३.१५ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार प्रवीण डांगे करीत असून आरोपीला जेरबंद करण्यासाठी संजय रिठे, बाळा तिवारी, महेंद्र गायकवाड, आरीफ फारूकी, सतिश नैताम, प्रवीण भोयर, निलेश गायकवाड, अभय खोब्रागडे, पिंटू पिसे, महेंद्र गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Do not bring the worldly literature as a rude quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.